Video : Gondia | पेट्रोल शंभरीपार, कशी आणणार कार? मग काय 25 बैलगाड्यातूनच नवरोबांनी गाठलं नवरीचं दार!

Video : Gondia | पेट्रोल शंभरीपार, कशी आणणार कार? मग काय 25 बैलगाड्यातूनच नवरोबांनी गाठलं नवरीचं दार!
गोंदियात 25 बैलबंड्यांवरून लग्नाची वरात
Image Credit source: t v 9

गोंदियात 25 बैलबंड्यांवरून लग्नाची वरात निघाली. इंधनदरवाढीमुळे बैलगाडीवरून वरात काढण्यात आली. लोकपरंपरा जपण्यासाठी उपक्रम राबविण्यात आलाय. डीजेवर फिल्मी गाण्यांऐवजी आदिवासी लोकगीतावर वऱ्हाडी थिरकले.

शाहिद पठाण

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 26, 2022 | 6:11 PM

गोंदिया : लग्न म्हटलं की, वाहनांची भलीमोठी रांग. कर्णकर्कश आवाजात वाजणारा डीजे आणि दारुच्या नशेत डोलणारी तरुणाई हेच चित्र डोळ्यासमोर येते. मात्र या दिखाव्याचे ढोंग बाजूला सारत देवरी तालुक्यातील कडीकसा येथील देवराज कुंभरे (Devraj Kumbhare) या तरुणाने आपलं लग्न वेगळ्या पद्धतीनं केलं. लग्नात कर्णकर्कश डीजे न ठेवता तब्बल 25 बैलबंड्यांतून 10 किलोमीटर वरात काढली. सध्या इंधनाचे दर वाढले आहेत. या इंधन दरवाढीमुळे प्रत्येक वर्ग त्रस्त आहे. आजच्या घडीला आधुनिकता आणि फॅशन च्या शर्यतीत प्रत्येकांना लग्न सोहळा करणे तारावरची कसरत वाटत आहे. अशा परिस्थितीत ही आदिवासी समाजातील तरुण पिढी आदिवासी रितीरिवाजाच्या पलीकडे लग्नासारखे विधी करतात. असाच एक लग्न सोहळा देवरी तालुक्यातील कडीकसा (Kadikasa in Deori taluka) (गणुटोला) येथील आदिवासी तडफदार तरुण देवराज भागीराम कुंभरे यांचा पार पडला. लग्न याच तालुक्यातील वांढरा येथील मनीराम कुंजाम यांची मुलगी टिकाबाली यांच्यासोबत काल पार पडला. या लग्न सोहळ्यात जाणारी वरात ही कार-बसने नाही तर तब्बल 25 बैलगाड्यांवरून (Balbandi) काढण्यात आली. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये उत्सुकता होती.

पाहा व्हिडीओ

लोककला जीवंत ठेवण्याचा प्रयत्न

वर देवराजच्या बैलगाडीपासून ते ज्या बैलगाडीमध्ये वराती बसणार आहेत त्यालाही आकर्षक देखावा करण्यात आला होता. अशी माहिती वर देवराज कुंभरे, वराची आई जैतूरबाई कुंभरे व वधू टीकाबाली कुंजाम यांनी दिली. आदिवासी रीतीरिवाज व संस्कृती प्रमाणे लग्नाच्या वरातीत फक्त आदिवासी लोकगीत सादर करण्यात आले. तसेच लोप पावत चाललेली कला या लग्नात सादर करण्यात वराडीही आदिवासी नृत्यावर थिरकले. हा विवाह सोहळा आदर्श ठरला. आपली लोकपरंपरा जीवंत ठेवण्याकरिता हा निर्णय घेतला असल्याचे देवराज कुंभरे यानं सांगितलं.

देवराज यूथ आइकॉन

गोंदियात 25 बैलबंड्यांवरून लग्नाची वरात निघाली. इंधनदरवाढीमुळे बैलगाडीवरून वरात काढण्यात आली. लोकपरंपरा जपण्यासाठी उपक्रम राबविण्यात आलाय. डीजेवर फिल्मी गाण्यांऐवजी आदिवासी लोकगीतावर वऱ्हाडी थिरकले. अशा प्रकारे बैलगाड़ीवर निघनारी लग्नाची वरातींची मिरवणूक तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात प्रथमच पहाव्यास मिळाली. अशी माहिती पंचायत समिती सदस्या अनुषाताराम व गावकरी कुमारसुदू ताराम यांनी दिली. या अभिनव उपक्रमामुळे तालुक्यातच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागात देवराज यूथ आइकॉन ठरला आहे. या लग्नाची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरू आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें