Gondia Flood : गोंदियात रेड अलर्ट, तिरोड्यातील अनेक गावांना पुराचा वेढा, जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली शाळेला सुटी

गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. आज सकाळपासूनच पावसाने जिल्ह्यामध्ये हजेरी लावली. धरणे, जलाशय आणि नद्यांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे.

Gondia Flood : गोंदियात रेड अलर्ट, तिरोड्यातील अनेक गावांना पुराचा वेढा, जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली शाळेला सुटी
तिरोड्यातील अनेक गावांना पुराचा वेढा
शाहिद पठाण

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Aug 10, 2022 | 2:32 PM

गोंदिया जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय. मुसळधार पावसामुळं जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेला सुटी (School Holiday) जाहीर केली आहे. तिरोडा तालुक्यात अनेग गावांना पुराचा वेढा आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनानं केलंय. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार गोंदिया जिल्हा हा रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. कालपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यात अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे. त्यामुळे तिरोडा तालुक्यातील गराडा, खमारी, चुरडी, लोधिटोला, धाद्री, उमरी सालेबर्डी, या गावाना पुराच्या पाण्यानी वेढा दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने (District Administration) सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा (Vigilance Warning) दिला आहे.

पाहा व्हिडीओ

जिल्ह्यातील सर्व शाळांना सुटी

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अलर्टनुसार गोंदिया जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय. जिल्ह्यात कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने अनेकांच्या घरी पाणी शिरले. यामुळे रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. तर अनेक घरी पाणी शिरल्याने कुलरच्या मोटारने घरातील पाणी काढत आहेत. असलेल्या मुसळधार पावसाने नदी नाले ओसंडून वाहत आहे. तळेसुद्धा ओव्हर फ्लो झाले आहेत. अतिवृष्टी होण्याची शक्यता लक्षात घेता संभाव्य अपघात टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय शाळा, अंगणवाडी, शिकवणी वर्ग यांना जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी 10 ऑगस्टला सुट्टी जाहीर केली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. आज सकाळपासूनच पावसाने जिल्ह्यामध्ये हजेरी लावली. धरणे, जलाशय आणि नद्यांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यामधील पुजारी टोला आणि कलीसारार धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कालीसरार धरणाचे 3 दरवाजे 0.30 मीटर उंचीवर म्हणजेच सुमारे 1 मीटर उघडण्यात आले आहेत. त्यामुळे 2 हजार 700 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. तर पुजारीटोला धरणाचे संपूर्ण 13 दरवाजे सुमारे 1.20 मीटर उघडले आहेत. त्यामुळे 36 हजार 980 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान, लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील संजय सरोवर धरणाचे 4 दरवाजे सुमारे 4 फूट आणि 2 दरवाजे अडीच फूट उघडण्यात आले आहेत. त्यामुळे 20 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बाग नदी आणि वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत प्रभावीपणे वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासानाद्वारे देण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें