AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; 2100 रुपयांच्या हप्त्याबाबत सर्वात मोठी अपडेट

शिर्डी मतदारसंघाच्या वतीने आयोजित जाहीर नागरी सत्काराच्या कार्यक्रमात विखे पाटील यांनी लाडक्या बहिणीच्या हप्त्यांबाबत महत्वाची माहीती दिलेली आहे.

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; 2100 रुपयांच्या हप्त्याबाबत सर्वात मोठी अपडेट
| Updated on: Jan 20, 2025 | 10:31 PM
Share

राज्य सरकारने लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी दिली आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यात २१०० रुपयांच्या हप्त्याची रक्कम नेमकी कधी पडणार  याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. येत्या मार्च महिन्यातील अर्थसंकल्पानंतर हे पैसे महिलाच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. ही योजना बंद करण्याची कोणतीही योजना नसल्याचे देखील जलसंपदा मंत्र्‍यांनी स्पष्ट केले आहे.

मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्य सरकारने विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहिण योजना सुरु केली होती. ही योजना जून महिन्यांपासून सुरु झाली आहे. या योजनेत आता १५०० च्या ऐवजी २१०० रुपयांचा हप्ता देण्याचे आश्वासन राज्य सरकारने निवडणूकाच्या जाहीरनाम्यात दिले होते. त्याची पूर्णता अर्थसंकल्पाची मांडणी झाल्यानंतर होणार आहे. आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते मिळालेले आहेत. आता डिसेंबर महिन्याचा लाडक्या बहिणीच्या खात्यावर पडण्यास सरुवात झाली आहे. आता २१०० रुपयाचा हप्ता थेट मार्च महिन्यातील अर्थ संकल्पानंतर मिळणार आहे.

मार्च महिन्यानंतर २१०० रुपये मिळणार

मार्च महिन्यातील बजेटनंतर लाडक्या बहिणींचा हप्ता 2100 रुपये होणार आहे. महायुती सरकार लाडक्या बहिणींना कधी दूर करणार नाही असे राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. शिर्डी मतदारसंघाच्या वतीने आयोजित जाहीर नागरी सत्काराच्या कार्यक्रमात विखे पाटील यांनी ही माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयांवरुन 2100 रुपये होणार असल्याचे देखील राधाकृ्ष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

Follow Us
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...