AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2000 कोटींचा घोटाळा, महिलांसोबत अश्लील व्हिडीओ IRS ऑफिसवर आरोप केल्याने खळबळ, भाजपाच्या नेत्याने थेट…

९ ते १८ महिन्यांत पैसे दुप्पट करण्याचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपये गोळा करण्यात आले, यातूनच २००० हजार कोटींचा घोटाळा आयआरएस अधिकारी सचिन मोटे यांनी केल्याचा आरोप भाजपाच्या बड्या नेत्याने केला आहे.

2000 कोटींचा घोटाळा, महिलांसोबत अश्लील व्हिडीओ IRS ऑफिसवर आरोप केल्याने खळबळ, भाजपाच्या नेत्याने थेट...
सचिन मोटेImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 26, 2026 | 6:03 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे सत्ताधारी बॅकफुटवर गेले आहे. त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. दुसरीकडे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ याचाही एका तृतीयपंथीयासोबतचा कथित व्हिडीओ चर्चेत आला आहे. झिरवाळ यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. असे असतानाच आता भाजपाचे नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आयआरएस अधिकारी सचिन मोटे यांच्यावर गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. सचिन मोटे यांनी तब्बल 2 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा दावा पडळकर यांनी केलाय.

२ हजार कोटींचा घोटाळा

माध्यमांशी बोलताना गोपिचंद पडळकर म्हणाले, मुंबईमध्ये घर असावे असे प्रत्येक कष्टकऱ्याला वाटते. जुन्या मुंबईत शक्य नाही म्हणून नवी मुंबईत लोक प्रयत्न करतात. व्याजाने पैसे उचलून बँक कर्जाने घराचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम करतात. एक आयआरएस अधिकारी सचिन मोटे यांनी नातेवाईकांच्या नावाने डीडीएसआर कंपनीच्या नावे २० प्रकल्प सुरू केले. आमदार व खासदारांसाठी इमारत ते तयार करत आहेत. आमदार व खासदार आमच्या खिशात असल्याचे ते सांगत आहेत, यामाध्यमातून त्यांनी २ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप पडळकरांनी केला.

पुढे ते म्हणाले, कलाकार आणि पत्रकार यांचीही एक सोसायटी ते तयार करत आहेत. वेगवेगळ्या इमारतीचे प्लॉट त्यांनी घेतले आहेत. गुंतवणूकदारांची यादी आहे. त्यांच्याकडून त्यांनी पैसे घेतले. ९ ते १८ महिन्यात पैसे दुप्पट करून देतो असो सांगून पैसे घेतले. प्लॉट घेऊन त्यांनी सोसायटी निर्माण केली. काही लोकांच्या नावाने त्यांनी सोसायटी निर्माण करत सरकारची फसवणूक केली. २०२० रोजी बुकिंग घ्यायला सुरुवात केली पण त्याचा ताबा सोडा आता भूमिपूजन केले जात आहे. ही लोकांची फसवणूक आहे. सीसी नसताना बांधकाम केले जात आहे. सिडकोचे अधिकारी यामध्ये गुंतलेले आहेत, हा फ्रॉड आहे. १.९७ कोटींचा दंड काही प्रकल्पांवर आहे. दंड असताना काम कसे करू शकतात. आमच्या गावाकडचे लोक आहेत, त्यांनी पैसे भरले आहेत. त्यांचे पैसे अडकले आहे. आयआरएस असल्याने लोकांना धमकी दिली जात आहे. चार मजल्यांची सीसी मिळाली तरीही वरच्या मजल्यांचे काम सुरू केले आहे. यावर्षी पझेशन देणार होते, ते आतातरी शक्य दिसत नाही.

महिलांसोबतचे व्हिडीओ

शेवटी गोपिचंद पडळकर म्हणाले की, उत्खनन केले पण रॉयल्टी भरली नाही, याबाबत महसूल मंत्री यांना मी भेटून तक्रार केली आहे. जीएसटी भरलेली नाही, तरीही कारवाई झालेली नाही. मातोश्री आमदार आणि खासदारांची बिल्डिंग चार वर्षांपूर्वी बांधायला घेतली पण चार वर्षे झाली तरी अद्याप काम झालेले नाही. ते रतन टाटाचा फोटो वापरत आहेत, सचिन मोटेंवर कारवाई करायला हवी. अशोक खरात प्रमाणे सचिन मोटे यांची फाईल समोर येईल, जे गुंतवणूकदार आहेत त्यांचे महिलांसोबतचे व्हिडिओ तयार केले आहेत, त्यांना ब्लॅकमेल केले जात आहे.

Follow Us
खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांचा खळबळजनक खुलासा
खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांचा खळबळजनक खुलासा.
चंद्रकांत खैरे यांचा अघोरी पूजेबाबत धक्कादायक दावा, राजकीय वर्तुळात...
चंद्रकांत खैरे यांचा अघोरी पूजेबाबत धक्कादायक दावा, राजकीय वर्तुळात....
आपल्या वयाच्या आधीच दातांचं वय वाढतं? कसं? तुमचं डेंटल एज
आपल्या वयाच्या आधीच दातांचं वय वाढतं? कसं? तुमचं डेंटल एज.
दातांचे वय वाढण्यापूर्वी व्हा सावध; आजच तुमचं डेंटल एज तपासा
दातांचे वय वाढण्यापूर्वी व्हा सावध; आजच तुमचं डेंटल एज तपासा.
इराण-इस्त्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय
इराण-इस्त्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय.
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय.
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर...
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर....
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?.
भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव
भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव.
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?.