AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीटखाली टाकलं, मांडीवर वार केला अन् संपवण्याचा… शरणू हांडेची भेट घेतल्यानंतर पडळकरांचा खळबळजनक खुलासा

सोलापुरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्या शरणू हांडे यांचे अपहरण करून त्यांच्यावर निर्घृण मारहाण करण्यात आली. पडळकर यांनी हत्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पडळकर यांनी पोलिसांच्या त्वरित कारवाईचे कौतुक केले आहे. या प्रकरणी पोलिसांचे तपास सुरू आहे.

सीटखाली टाकलं, मांडीवर वार केला अन् संपवण्याचा... शरणू हांडेची भेट घेतल्यानंतर पडळकरांचा खळबळजनक खुलासा
Gopichand Padalkar meet sharanu hande
| Updated on: Aug 08, 2025 | 12:07 PM
Share

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एका कार्यकर्त्याचे फिल्मी स्टाईलने अपहरण करण्यात आले. सोलापुरात घडलेल्या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. शरणू हांडे असे मारहाण करण्यात आलेल्या कार्यकर्त्याचे नाव असून सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अमित सुरवसेसह त्याच्या सहा साथीदारांना अटक केली आहे. आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरणू हांडेंची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

गोपीचंद पडळकर काय म्हणाले?

भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांनी मारहाण झालेला त्यांचा समर्थक शरणू हांडेंची भेट घेतली. यावेळी त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. यानंतर गोपीचंद पडळकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत थेट भाष्य केले. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी शरणू हांडेला पूर्ण मारुन टाकण्याचा प्लॅन होता, असा आरोप केला. “शरणूचे अपहरण करणारी गाडी MH 12 पासिंगची म्हणजे पुण्याची होती. त्यातून काही मुले आली. त्यांनी त्याच्या गळ्याला तलवार लावून त्याला गाडीत कोंबलं. मी याबद्दल पोलिसांना फोन केला. त्यांनी तात्काळ यंत्रणेचा वापर करत शरणूला वाचवले. मी याबद्दल पोलिसांचे मी विशेष अभिनंदन करेन. कारण शरणू हांडे हा फक्त पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला आहे”, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

“शरणू हांडेला भेटलो. यावेळी शरणू हांडेंने मला काही गोष्टी सांगितल्या. मी गेल्या गेल्या मधल्या सीटखाली टाकलं. त्यांनी सुरुवातीला माझ्या मांडीवर वार केला. त्यांच्या मांडीवर जखम आहे. त्यांच्या मांडीवर टाके आहेत. यानंतर त्याला पूर्ण मारुन टाकण्याचा प्लॅन होता. त्यांच्याकडे जे काही साहित्य सापडलं आहे, त्यातील काही मूल ही रस्त्यात उतरली. त्यांची शरणूला मारुन टाकायचे की नाही, यावरुन बाचाबाची झाली. अमानुषपणे हत्या करायची, व्हिडीओ करायचे, अशा पद्धतीची माहिती मला मिळतेय. या प्रकरणातील जे आरोपी आहेत. त्याचे मूळ शोधा”, असा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला.

शरणू हांडे यांची प्रतिक्रिया काय?

दरम्यान शरणू हांडे यांनी नुकतंच टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत नेमकं काय घडलं याबद्दल सांगितले होते. “मी पानटपरी जवळ उभा होतो. अचानक एक गाडी आली आणि त्यातून काही लोक उतरले. त्यांनी थेट माझ्यावर हल्ला करायला सुरुवात केली. त्यांनी मला मारहाण केली. यानंतर गाडीत कोंबले. त्यानंतर माझे पाय बांधले. ते मला कुठेतरी घेऊन जात होते. ते एकूण सात लोक होते. त्यांच्या हातात कोयते, हॉकी स्टिक आणि तलवार अशी धारदार हत्यारं होती. गाडीतही मला सतत मारहाण करत होते. त्यामुळे मला कुठे घेऊन जात आहेत हे मला कळलं नाही.” असे शरणू हांडे यांनी म्हटले होते.

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.