AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला, मागण्या मान्य होणार की नाही? विखे पाटलांनी मांडली सरकारची बाजू

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे. ते 30 मे पासून उपोषण सुरू करणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.

सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला, मागण्या मान्य होणार की नाही? विखे पाटलांनी मांडली सरकारची बाजू
सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 29, 2026 | 5:52 PM
Share

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे. ते 30 मे पासून उपोषण सुरू करणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला असून, सरकारच्या शिष्टमंडळाने आंतरवाली सराटीमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. या शिष्टमंडळामध्ये राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांचा समावेश आहे. यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारने मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत जे जे काही निर्णय घेतले त्यांची माहिती मनोज जरांगे पाटील यांना दिली आहे.

नेमकं काय म्हणाले विखे पाटील? 

प्रमाणपत्र वाटपाबाबत एसओपी तयार करण्यात आली आहे,  त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात प्रमाणपत्र देण्याबाबत सुलभता येईल. कुणबी प्रमाणत्रपत्र देण्याची कार्यवाही सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या निष्क्रियेतेमुळे प्रमाणपत्र देण्यास विलंब झाला. अधिकाऱ्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. जनजागृतीसाठी गावपातळीवर समिती गठीत करण्यात आली आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये नोंदी नाहीत, पण आकडे आहेत. हैदराबाद गॅझटचं प्रकरण सध्या कोर्टात प्रलंबित आहे, अशी माहिती यावेळी विखे पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. याबाबत देखील यावेळी विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांना माहिती दिली. आंदोलनातील 668 गुन्ह्यांपैकी 567 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. 191 गुन्हे हे कोर्टात प्रलबिंत आहेत.  या गुन्ह्यांसंदर्भात काय करता येईल याचा देखील विचार सुरू आहे, असंही यावेळी विखे  पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान  समाजबांधवांना न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे. 58 लाख नोंदीपैकी 12 लाख प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांकडून वारंवार पाठपुरावा सुरू आहे.  मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार सुरू आहे, अशी माहिती देखील यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी बोलताना दिली आहे. दरम्यान आता यावर मनोज जरांगे पाटील नेमका काय निर्णय घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट