अल्पमतात बनलं सरकार! मताधिक्य नसताना विरोधकांच्या चुकीने गळ्यात पडली सरपंचाची माळ

चक्क अर्जात सुचकाचे नाव चुकविणे बाशिंग बांधून असणाऱ्या उमेदवाराला चांगलेच भोवले आहे. त्याच्या घोडचूकीमुळे मात्र, गावातील लोकांची इच्छा असणाऱ्या दुसऱ्याला सरपंच पद मिळाले आहे.

अल्पमतात बनलं सरकार! मताधिक्य नसताना विरोधकांच्या चुकीने गळ्यात पडली सरपंचाची माळ
Follow us
| Updated on: Feb 12, 2021 | 10:34 AM

वर्धा : गावाचा विकास साधण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या नागरिकाला कशी संधी मिळते हे बरेचदा दुर्मिळतेने पाहायला मिळते. अशीच संधी एका छोट्या गावात असणाऱ्या एकाला गवसली आहे आणि तेही सरपंच पदाच्या स्पर्धेत असणाऱ्या विरोधकांच्या घोड चुकीमुळे. चक्क अर्जात सुचकाचे नाव चुकविणे बाशिंग बांधून असणाऱ्या उमेदवाराला चांगलेच भोवले आहे. त्याच्या घोडचूकीमुळे मात्र, गावातील लोकांची इच्छा असणाऱ्या दुसऱ्याला सरपंच पद मिळाले आहे. आता सरपंच पदासाठी दावेदार असणाऱ्या उमेदवाराला मात्र यामुळे निवडून येणाऱ्याला राम राम सरपंच म्हणायची वेळ आली आहे. (Government formed in minority there was no majority still man won because of opposition mistake)

समुद्रपूर तालुक्यातील मोहगाव ग्रामपंचायतिच्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीत बहुमत असणाऱ्या गटातील सरपंच आणि उपसरपंच उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरल्याने अल्प मताधिक्यातच सरपंच, उपसरपंच निवडल्या गेले आहेत. आपण सरपंच बनू हे स्वप्न गावी देखील नसताना अचानक नशीब खुलल्याने सरपंच बनलेल्या सदस्यांना लॉटरीच लागली आहे. तर दुसरीकडे मात्र, राजकीय धुरंधर या लॉटरीकडे पाहूनच चकित झाले आहेत.

गावच्या सरपंच आणि उपसरपंच पदासाठी निवडणूक होती. सरपंच बनणार असे स्वप्न रंगवून असणारे आपले उमेदवार आठ दिवसांपासून देवदर्शनासाठी नेऊन बाशिंग बांधूनच होते. मोहगाव ग्राम पंचायतमध्ये देखील सरपंच पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले. ज्यांना बहुमत होते त्या गटातील सरपंच व उपसरपंच पदाच्या उमेदवाराने अर्जात सूचक म्हणून ग्रामपंचायतीच्या सदस्य ऐवजी गावातील नागरिकाचे नाव टाकले. त्यामुळे अचानक बहुमत नसणाऱ्या उमेदवाराचे अर्ज पात्र ठरले आहेत.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सरपंच पदाच्या बोहल्यावर चढणाऱ्या बहुमतातील सदस्याएवजी फक्त विकासाचा ध्यास मनात बाळगून असलेल्या विरोधकाच्याच डोक्याला बाशिंग बांधावे लागले आहे. केवळ तिन सदस्य असणाऱ्या गटाचा यात विजय झाला असून ते दोघेच सरपंच आणि उपसरपंच बनले आहेत.

मोहगाव ग्रामपंचायतीत नऊ सदस्यांचा समावेश असून या ग्रामपंचायतीत पाच छोट्या गावांचा समावेश आहे.सरपंच निवड प्रक्रियेत एका गटाकडून 6 सदस्य तर एका बाजूला 3 सदस्य असे मताधिक्य होते. यावेळी मताधिक्य नसलेल्या गटाकडून सरपंच पदासाठी विलास नवघरे आणि उपसरपंच पदासाठी सपना बाभळे यांनी अर्ज दाखल केले. तर विरोधी गटातून जगदीश महातळे यांनी सरपंच पदासाठी आणि संदीप दातारकर यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केले होते. मात्र अर्ज छाननीत जगदीश महातळे आणि संदीप दातारकर यांनी उमेदवारी अर्ज अपात्र ठरले.

यावेळी निवडणूक अधिकारी अशोक अगीदेवार, ग्रामसेवक संतोष पुरकाम यांनी निवडणूक प्रक्रिया नियमानुसार पात्र उमेदवार विलास नवघरे यांना सरपंच म्हणून घोषित केले तर उपसरपंच म्हणून सपना बाभळे यांना घोषित करण्यात आले आहे. (Government formed in minority there was no majority still man won because of opposition mistake)

संबंधित बातम्या – 

Aurangabad municipal election 2021 | भाजपकडे इच्छुकांची रांग, तब्बल 1200 अर्ज, अटीतटीची लढत होणार

सावधान, पुण्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय, 15 पासून महाविद्यालय सुरु होणार

VIDEO: सीडी लावण्याचं काम अजून बाकी; गिरीश महाजनांच्या मतदारसंघात येऊन खडसेंचा इशारा

Nagpur Corona Update | नागपुरात पुन्हा कोरोनाचा ब्लास्ट, 24 तासात 500 नवे रुग्ण

(Government formed in minority there was no majority still man won because of opposition mistake)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.