Aurangabad municipal election 2021 | भाजपकडे इच्छुकांची रांग, तब्बल 1200 अर्ज, अटीतटीची लढत होणार

औरंगाबाद महापालिकेची निवडणूक पुढील महिन्यात होणार असल्याचे सांगितले जात असल्यामुळे येथे भाजपने प्रबळ उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. (Aurangabad municipal election BJP)

Aurangabad municipal election 2021 | भाजपकडे इच्छुकांची रांग, तब्बल 1200 अर्ज, अटीतटीची लढत होणार
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकांची प्रत्यक्ष तारीख जाहीर झालेली नसली तरी  निवडणूक जिंकण्यासाठी चांगले उमेदवार शोधण्याची तयारी मोठ्या पक्षांनी सुरु केली आहे. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक (Aurangabad municipal election) पुढील महिन्यात होणार असल्याचे सांगितले जात असल्यामुळे येथे भाजपने प्रबळ उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. भाजपने इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे सांगितले असून येथे आतापर्यंत तब्बल 1200 इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीत उतरण्यासाठी आपले अर्ज दाखल केले आहेत. (Aurangabad municipal election BJP asking application to the interested candidates)

इच्छुकांचे तब्बल 1200 अर्ज

औरंगाबादच्या महापालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष असते. येथील महापालिकेवर शिवसेनेचे दीर्घाकाळ वर्चस्व असल्यामुळे यावेळी महापालिका खिशात घालण्यासाठी भाजपने जंगी तयारी सुरु केली आहे. भाजपकडून तगड्या आणि प्रबळ उमेदवारांचा शोध सुरु झालाय. त्यासाठी येथे भाजपने आगामी पालिका निवडणुकीसाठी इच्छुकांना उमेदवारी अर्ज देण्याचे आवाहन केलंय. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून भाजपतर्फे निवडणूक लढण्यासाठी तब्बल 1200 उमेदवारी आपला अर्ज दाखल केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज आले असले तरी, भाजपने आणखी अर्ज करण्याचे आवाहन इच्छुकांना केले आहे. त्यामुळे भाजपचा यावेळी प्रबळ उमेदवार शोधण्यावर जास्त भर असेल असे सांगण्यात येतंय.

पक्षीय बलाबल काय?

येथील महापालिका निवडणूक नेहमीच अटीतटीची होते. मात्र, यावेळची औरंगाबाद महापालिकेची निवडणूक बहुरंगी होणार असल्याचे सांगितले जातेय. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्यामुळे पालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांना याचा फायदा होणार का?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच राज्यात हे तिन्ही पक्ष एकत्र असले तरी औरंगाबादेतील सत्ताधारी शिवसेना स्वबळावर रिंगणात उतरु शकते. शिवसेना स्वबळावर रिंगणात उतरल्यास तिला भाजप आणि एमआयएम या पक्षांचं तगडं आव्हान असेल. यावेळी मनसेही पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याचं दिसतंय. तर निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसुद्धा कसोसीने प्रयत्न करणार असल्याचं सागिंतलं जात आहे.

औरंगाबाद महापालिका पक्षीय बलाबल

शिवसेना – 29 भाजप – 22 एमआयएम – 25 कॉंग्रेस – 10 राष्ट्रवादी – 03 बसप – 05 रिपब्लिकन पक्ष – 01 अपक्ष – 18

(संदर्भ : विकीपीडिया)

इतर बातम्या :

Special Story | औरंगाबाद की संभाजीनगर? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वाद आणि राजकारण!

औरंगाबादेत नव्या छाव्यांना संधी, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेची जुळवाजुळव

मुंडेंची गच्छंती, टोपे नवे संपर्कप्रमुख! औरंगाबाद पालिकेसाठी राष्ट्रवादीचा मोठा निर्णय

(Aurangabad municipal election BJP asking application to the interested candidates)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI