AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai : पुन्हा पुन्हा मोहम्मद रफी जन्माला यावेत अशी प्रार्थना करु- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

संगीत जगतात आपले अढळ स्‍थान निर्माण करणाऱ्या पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांना यावर्षीचा मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्‍कार तर सुप्रसिध्‍द गायिका कविता कृष्‍णमुर्ती यांना सन 2021चा मोहम्‍मद रफी पुरस्‍कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

Mumbai : पुन्हा पुन्हा मोहम्मद रफी जन्माला यावेत अशी प्रार्थना करु- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 7:38 PM
Share

मुंबई : मोहम्मद रफी यांचे स्मरण करताना आपण इश्वराकडे प्रार्थना करु या की, असे महान कलावंत पुन्हा पुन्हा आपल्यामध्ये जन्म घेऊ दे, तर पाश्चात्याचे चांगले आहे ते घेतलेच पाहिजे पण अनुकरण करताना त्यामध्ये वाहत जाऊ नये, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांच्या स्पंदन या संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी एका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंताला जीवन गौरव व मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. पुरस्काराचे हे चौदावे वर्ष असून एक लाख रू. रोख, स्मृतीचिन्ह आणि शाल श्रीफळ असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप असून, 51 हजार रू. रोख आणि मानचिन्ह असे रफी पुरस्काराचे स्वरूप आहे.

पंडित ह्रदयनाथ मंगेशकरांना मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्‍कार

संगीत जगतात आपले अढळ स्‍थान निर्माण करणाऱ्या पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांना यावर्षीचा मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्‍कार तर सुप्रसिध्‍द गायिका कविता कृष्‍णमुर्ती यांना सन 2021चा मोहम्‍मद रफी पुरस्‍कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कविता कृष्णमूर्ती यांचा पुरस्कार त्यांचे पती प्रसिद्ध व्हायोलिन वादक पद्मश्री एल सुब्रमण्यम यांनी स्विकारला. यावेळी पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांनी हा पुरस्कार स्विकारताना मला आनंद होत असून रफी ही एक संगीताला लाभलेली दैवी देणगीच होती. ते कलावंत म्हणून मोठे होते तेवढेच माणूस म्हणून मोठे होते. आपल्याला दैवाकडून जे मिळाले ते त्यालाच परत कसे करायचे याची जाण त्यांना होती. त्यामुळे ते कसे कसे या दैवी देणगीची परतफेड करायचे ते मी पहिलेय. असे सांगत पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांनी रफी यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.

कलावंत हा अमर असतो

यावेळी राज्यपालांनी, रफी पुरस्कार सुरु केल्याबद्दल आमदार आशिष शेलार यांचे कौतुक केले. कलावंत हा अमर असतो. कलाकार किती ह्रदया पर्यंत पोहचतो त्यावरच तो अमर होतो. रफी साहेबांना हे अमरत्व प्राप्त झाले आहेच. पण आज त्यांच्या सारख्या कलावंताचे स्मरण करताना पुन्हा पुन्हा असे महान कलावंत जन्माला यावे , अशी प्रार्थना आपण करु यास, असे आवाहनच राज्यपालांनी रफींच्या चाहत्यांना केला. या कार्यक्रमाला आमदार आशिष शेलार, प्रतिमा शेलार यांच्यासह रफी यांच्या कन्या नसरीन आणि यास्मिन याही उपस्थितीत होत्या. या नंतर फिर रफी ही गाण्यांची मैफल रंगली.

कोंबड्या फक्त भाईच्याच दुकानात घ्यायच्या… दुकानदाराला टोळक्याची मारहाण; कल्याणमध्ये चाललंय काय?

ह्युंडईकडून अवघ्या 31 महिन्यात 2.5 लाख Venue SUVs ची विक्री, जाणून घ्या कारला इतकी डिमांड का?

Nagpur Sports | कुस्तीपटू समीक्षाचा ग्रॅपलिंग स्पर्धेत दिल्लीत झेंडा! पण, भिलगाव ते नागपूर सायकलिंगचा प्रवास काही संपेना

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.