AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुती तुटणार? शिवसेना शिंदे गटाकडून तयारी सुरू, नेमकं काय घडतंय?

एकीकडे शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये विधान परिषद निवडणुकीवरून रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे आता राजकीय वर्तुळातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे चर्चेला उधाण आलं आहे.

महायुती तुटणार? शिवसेना शिंदे गटाकडून तयारी सुरू, नेमकं काय घडतंय?
Eknath Shinde, Devendra FadnavisImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 24, 2026 | 5:46 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. एकीकडे विधान परिषद निवडणुकीवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. जळगावच्या विधान परिषद जागेवर दोन्ही पक्षाकडून दावा करण्यात आला आहे.  जळगावच्या विधान परिषद जागेवरून शिवसेना शिंदे गटाचे नेते किशोर पाटील यांनी अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. ही जागा शिवसेनेलाच मिळावी अशी त्यांची भूमिका आहे. तसेच जर महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेला मिळणार नसेल तर या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत व्हावी असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. दरम्यान विधान परिषद निवडणुकीवरून रस्सीखेच सुरू असतानाच आता दुसरीकडे जिल्हा परिषद निवडणुकीबाबत बोलताना शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी मोठं विधान केलं आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

नेमकं काय म्हणाले मस्के? 

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये युती हो अगर ना हो शिवसैनिक भगवा फडकवण्यासाठी तयार आहेत. याचीच बांधणी करण्यासाठी शिवसेनेचा शिवसंवाद दौरा होता, असं मोठं विधान नरेश मस्के यांनी केलं आहे. त्यामुळे आता आगामी जिल्हा परिषद निवडणुका या युतीत होणार की दोन्ही पक्ष ही निवडणूक वेगवेगळी लढणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये युती हो अगर ना हो शिवसैनिक भगवा फडकवण्यासाठी तयार आहेत. याचीच बांधणी करण्यासाठी शिवसेनेचा शिवसंवाद दौरा होता. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.  शहापूर आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा होता, असं मस्के यांनी म्हटलं आहे.

ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया 

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरची देखील जोरदार चर्चा सुरू आहे, यावर देखील यावेळी मस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे साहेब स्वतःच टायगर आहेत, डॉक्टर टायगर!  त्यामुळे त्यांना ऑपरेशन टायगरची गरज नाही, असं वक्तव्य यावेळी मस्के यांनी केलं आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ