बाप्पाच नाही, पुजारी, स्वयंसेवक, स्वयंपाकी आणि सुरक्षा रक्षकांचाही विमा… भूकंपापासून ते… काय काय कव्हर? गणेश मंडळाचं अनोखं पाऊल
Richest Ganesh Mandal - 2023 साली गणपती बाप्पाच्या मूर्तीला 66 किलो सोने आणि 295 किलो चांदीने सजवण्यात आले होते. गेल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये बाप्पाच्या मूर्तीला 69 किलो सोन्याचे दागिने आणि सुमारे 336 किलो चांदीच्या दागिन्यांनी सजवण्यात आले होते. मात्र यावेळी बाप्पाची मूर्ती सजवण्यासाठी किती किलो सोन्या-चांदीचे दागिने वापरले जातील हे जीएसबी मंडळाने अद्याप उघड केलेले नाही.

सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन होण्यास आता अवघे काहीच दिवस उरले असून देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह जाणवक आहे. यंदा 27 ऑगस्टला बाप्पा अनेकांच्या घरी विराजमान होणार आहेत. महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत साजारा होणा गणेशोत्सव हा जगभरात प्रसिद्धआहे. मुंबईतील अनेक गणेशमूर्तीं अद्वितीय असतात, त्यांन पाहण्यासाठी , आशीर्वाद घेण्यासाठी लांबूनही लोक येत असतात. मुंबईतील गौड सारस्वत ब्राह्मण मंडळ (GSB सेवा मंडळ) सर्वात भव्य आणि महागडा गणपती मंडप उभारतं. यावेळीही GSB मंडळ सर्वात श्रीमंत गणपती स्थापन करणार आहे. विशेष म्हणजे या वर्षी, जीएसबी मंडळाने त्यांच्या मंडपासाठी 474.4 कोटी रुपयांचे विक्रमी विमा कव्हर घेतलं आहे. गेल्या वेळी, 400.8 कोटी रुपयांचा विमा घेण्यात आला होता.
यावर्षी विम्याच्या रकमेत वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे गणपती मूर्तीला अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची वाढती किंमत आणि सेवकांच्या संख्येत झालेली वाढ. न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीने मंडळाला हे विमा कवच प्रदान केले आहे. या पॉलिसीमध्ये ऑल रिस्क कव्हर, स्टँडर्ड फायर (आग) आणि स्पेशल पेरिल पॉलिसी (भूकंपाच्या जोखमीसह), सार्वजनिक दायित्व आणि नोकरांसाठी वैयक्तिक अपघात कव्हर हे समाविष्ट आहे.
474.4 कोटी रुपयांच्या या विम्याचा सर्वात मोठा हिस्सा 375 कोटी रुपयांचा आहे जो चाकर, स्वयंपाकी, गद्दीदार, चप्पल स्टॉल कामगार, वॉलेट पार्किंग कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी यासारख्या सेवकांच्या वैयक्तिक अपघात विम्यासाठी आहे. त्यानंतर 67 कोटी रुपयांचा विमा आहे, आहे ज्यामध्ये सोने-चांदीचे दागिने आणि इतर जोखीम समाविष्ट आहेत. याशिवाय, मंडळाने 30 कोटींचे सार्वजनिक दायित्व कव्हर आणि 2 स्टँडर्ड फायरन आणि स्पेशल पेरिल पॉलिसी (विशेष संकट धोरण) देखील घेतले आहे.
69 किलो सोनं आणि 336 किलो चांदीने सजले होते गणराय
2023 साली गणपती बाप्पाच्या मूर्तीला 66 किलो सोने आणि 295 किलो चांदीने सजवण्यात आले होते. गेल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये बाप्पाच्या मूर्तीला 69 किलो सोन्याचे दागिने आणि सुमारे 336 किलो चांदीच्या दागिन्यांनी सजवण्यात आले होते. मात्र यावेळी बाप्पाची मूर्ती सजवण्यासाठी किती किलो सोन्या-चांदीचे दागिने वापरले जातील हे जीएसबी मंडळाने अद्याप उघड केलेले नाही. तसेच 474 कोटी रुपयांच्या विमा संरक्षणासाठी किती प्रीमियम भरला गेला आहे हे देखील त्यांनी उघड केलेले नाही.
किंग्ज सर्कलमध्ये होते सर्वात श्रीमंत गणपतीची स्थापना
जीएसबी गणेश मंडळ मुंबईतील किंग्ज सर्कल परिसरात आहे आणि येथे सामान्य लोक तसेच अनेक सेलिब्रिटीदेखईल बाप्पाला बेच देऊ आशीर्वाद घेतात. यंदा जीएसबी सेवा मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे हे 71 वे वर्ष आहे. 2024 साली उभारलेला संपूर्ण मंडप अग्निरोधक होता आणि त्याचे पाच दिवसांचे भाडे 1.5कोटी रुपये होते. गणपती दर्शनासाठी मंडपात प्रवेश क्यूआर कोडद्वारे देण्यात येत होता. भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करता, सेवा मंडळाने मंडपात सर्व ठिकाणी चेहऱ्याची ओळख पटवणारे कॅमेरे बसवले होते.
