Video: उद्धव ठाकरेंच्या मंत्री मेळघाटात गोपनीय दौऱ्यावर; दिपाली चव्हाणांच्या आत्महत्येनंतर महिला वन कर्मचाऱ्यांच्या भेटीगाठी

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर या आज अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात आल्या आहेत. (Guardian Minister yashomati thakur visited melghat after dipali chavan suicide)

Video: उद्धव ठाकरेंच्या मंत्री मेळघाटात गोपनीय दौऱ्यावर; दिपाली चव्हाणांच्या आत्महत्येनंतर महिला वन कर्मचाऱ्यांच्या भेटीगाठी
yashomati thakur


अमरावती: राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर या आज अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात आल्या आहेत. वन अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या मृत्यूनंतरचा यशोमती ठाकूर यांचा हा पहिलाच दौरा आहे. हा दौरा त्यांनी गोपनीय ठेवला होता. अचानक मेळघाटात येऊन त्यांनी महिला वन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांची विचारपूस केली. खास करून वरिष्ठांकडून त्रास होत नाही ना, चांगली वागणूक मिळते ना आदी बाबींची त्यांनी विचारपूस केली. मात्र, ठाकूर यांच्या या अचानक झालेल्या दौऱ्याने वन विभागातील अधिकारी वर्गाची चांगलीच पळापळ झाली. (Guardian Minister yashomati thakur visited melghat after dipali chavan suicide)

महिला कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा छळ, अन्याय मुळीच सहन करता कामा नये. अन्यायाचा वेळीच प्रतिकार केला पाहिजे. कुठेही अपप्रकार होत असल्यास वेळीच तक्रार द्यावी. शासन महिला भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा संवाद राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील महिला वनकर्मचाऱ्यांशी साधला. मेळघाटातील वन अधिकारी दिपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर येथील महिला अधिकारी व कर्मचारी पार खचून गेल्या होत्या त्यामुळे दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर यशोमती ठाकूर यांचा हा दौरा महत्त्वाचा होता.

दोन दिवस मेळघाटात

मेळघाटातील महिला वनकर्मचाऱ्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी, वरिष्ठांकडून होणारा जाच आदींबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी मेळघाटातील दुर्गम भागातील विविध ठिकाणी सतत दोन दिवस गोपनीय दौरा केला व महिला वनकर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांचे मनोबल वाढविले. यावेळी त्यांनी या महिला कर्मचाऱ्यांकडून दिपाली चव्हाण यांच्याबाबतची माहितीही घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. ठाकूर यांच्या या अचानक झालेल्या दौऱ्यामुळे अधिकाऱ्यांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले होते.

विनोद शिवकुमार रुद्रच्या विभागात पुरुषांचाही छळ होता

दिपाली चव्हाणने आत्महत्या केली. हा प्रकार धक्कादायक होता. त्यामुळे या महिलांशी संवाद साधला पाहिजे, असं मला वाटलं. ते माझं खातं आहे आणि कर्तव्यही आहे. या महिला काम करतात, त्यांचा मानसिक छळ होतो का? त्यांना रात्र जंगलात घालावी लागते, त्या सुरक्षित आहेत का? त्यांच्यासोबत नेमकं काय होतं? त्या कशा प्रकारे राहतात? म्हणून त्यांच्यासोबत बैठका घेतल्या. सर्व डिव्हिजनमध्ये गेलो आणि त्यांचं म्हणणं जाणून घेतलं. विनोद शिवकुमार रुद्र या व्यक्तिच्याच विभागात महिलांना आणि पुरुषांचाही मानसिक छळ होत असल्याचं दिसून आलं, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या. दिपाली आपल्यातून गेली. परंतु, या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आम्ही गेलो आणि या महिलांच्या सोयी सुविधांचीही माहिती घेतली, असं त्यांनी सांगितलं.

काय आहे दिपाली चव्हाण प्रकरण?

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र महिला अधिकारी दीपाली चव्हाण यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केलीय. आत्महत्येपूर्वी दीपाली चव्हाण यांनी एक सुसाईट नोट लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी DFO विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचं चव्हाण यांनी म्हटलंय. दीपाली यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान सरंक्षक रेड्डी यांच्या नावे ही सुसाईड नोट लिहिण्यात आली आहे. यात वरिष्ठ अधिकारी DFO विनोद शिवकुमार यांनी मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर अखेर DFO विनोद शिवकुमार यांच्यावर धारणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Guardian Minister yashomati thakur visited melghat after dipali chavan suicide)

संबंधित बातम्या:

नवरोबा, आपण बाळाला गमावलं, तू पुन्हा लग्न कर, पण नोकरीवाली बायको नको, दीपाली चव्हाणचं पतीला पत्र, जसंच्या तसं

साताऱ्याची दीपाली, मेळघाटात वनअधिकारी, स्वत:वर गोळी झाडली, हादरवणारी सुसाईड नोट जशीच्या तशी

ना भान, ना बोलण्याची तमा, कथित अधिकाऱ्यासोबत दीपाली चव्हाण यांचं संभाषण

(Guardian Minister yashomati thakur visited melghat after dipali chavan suicide)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI