AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

15 नगरसेवक असतानाही शिवसेनेचा नगराध्यक्ष कसा पडला? गुलाबराव पाटलांचा खळबळजनक खुलासा, म्हणाले…

धरणगाव नगरपालिकेत शिवसेनेचा नगराध्यक्ष पराभूत झाल्याची खंत मंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोर आढावा बैठकीत बोलून दाखवली.

15 नगरसेवक असतानाही शिवसेनेचा नगराध्यक्ष कसा पडला? गुलाबराव पाटलांचा खळबळजनक खुलासा, म्हणाले...
gulabrao patil
| Updated on: Jun 07, 2026 | 8:40 AM
Share

जळगाव जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा पहिला नगराध्यक्ष देणारा तालुका म्हणून धरणगाव तालुक्याची ऐतिहासिक ओळख आहे. या बालेकिल्ल्यात अनेक वर्षे शिवसेनेने आपले निर्विवाद वर्चस्व राखत नगराध्यक्ष पदावर कब्जा मिळवला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत पक्षाला पहिल्यांदाच या प्रतिष्ठेच्या जागेवर पराभवाचा धक्का सहन करावा लागला. धरणगाव येथील नगराध्यक्ष पदाच्या या पराभवाबद्दलची तीव्र खंत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जाहीरपणे बोलून दाखवली आहे.

अमळनेर येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव ग्रामीण मतदारसंघाची राजकीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आगामी रणनीतीवर चर्चा होत असताना, मंत्री गुलाबराव पाटील भावूक झाले. त्यांनी मतदारसंघातील अंतर्गत राजकीय घडामोडींवर भाष्य केले.

१५ नगरसेवक असूनही नगराध्यक्ष पराभूत 

या बैठकीत पक्षाच्या कामगिरीचा पाढा वाचताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, आम्ही धरणगाव नगराध्यक्ष पदाची निवडणूक हरलो असलो, तरी या नगरपालिकेत आमचे नगरसेवक आजही मोठ्या संख्येने निवडून आलेले आहेत. नगरपालिकेत आपले तब्बल १५ नगरसेवक असतानाही नगराध्यक्ष पदाची मुख्य जागा आपल्या हातातून जाणे हे मनाला टोचणारे आहे.”

धरणगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे १५ नगरसेवक निवडून आले होते, तर प्रतिस्पर्धी शहर विकास आघाडीकडे केवळ ८ नगरसेवक होते. संख्याबळ असूनही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पराभूत झाल्याने पक्षात अंतर्गत ‘क्रॉस वोटिंग’ झाल्याचे स्पष्ट झाले होते. याबद्दलची खंत आजही गुलाबराव पाटील यांच्या मनात कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.

नशिराबाद आणि बाजार समितीच्या निकालांचे दिले दाखले

गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या राजकीय परिस्थितीची तुलना करत कार्यकर्त्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, शेजारच्या नशिराबाद येथे महायुतीमध्ये भाजपचा नगराध्यक्ष सहज निवडून आला; मात्र धरणगावमध्ये एवढी मोठी ताकद आणि अनुकूल वातावरण असूनही आपला नगराध्यक्ष पडला. फक्त धरणगाव नगरपरिषदच नव्हे, तर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आणि व्यापाराची सर्वात मोठी आर्थिक नाडी समजली जाणारी ‘जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती’ देखील यावेळी आपल्या हातातून निसटली असून तिथे आपण पराभूत झालो, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

दरम्यान आपल्याच बालेकिल्ल्यात झालेल्या या राजकीय पीछेहाटीचा आढावा घेत, आगामी विधानसभा आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या चुका सुधारून पुन्हा एकदा एकजुटीने आणि ताकतीने मैदानावर उतरण्याचे आवाहन गुलाबराव पाटील यांनी शिवसैनिकांना केले. या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात