AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘टोल टोल टनटनाटन…’, सदावर्तेंनी पुन्हा राज ठाकरेंना डिवचलं, काय दिला सल्ला?

पुन्हा एकदा गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी टोलच्या मुद्द्यावरून डिवचलं आहे.

'टोल टोल टनटनाटन...', सदावर्तेंनी पुन्हा राज ठाकरेंना डिवचलं, काय दिला सल्ला?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 14, 2025 | 4:59 PM
Share

ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. टोलच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. ‘टोल टोल टनटनाटन’ म्हणत सदावर्ते यांनी राज ठाकरे यांना डिवचलं आहे. दरम्यान सदावर्ते यांच्या टीकेनंतर मनसेकडून देखील जोरदार पलटवार करण्यात आला आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी महाराष्ट्रासाठी काय केलंय, असा सवाल मनसे नेते अमेय खोपकर यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले सदावर्ते? 

गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. टोलच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. ‘राज ठाकरेंवर काय बोलायचं? तर मी एक म्हणेल राज ठाकरे तुम्ही एक करा, टोल -टोल टनटनाटन, अरे टोल के उपर गिनो भाई, अरे टोल के उपर गिनो, लेकीन राज समज लेना इस राज के अंदर कभी भी भाषा के उपर अपनी राजनिती की रोटी न शेकना’ असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

दरम्यान त्यानंतर आता गुणरत्न सदावर्ते यांच्या या टीकेला मनसेकडून देखील जशास तसं उत्तर देण्यात आलं आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी जोरदार पलटवार केला आहे. ‘कोण गुणरत्न सदावर्ते ते कर्जतवरून बोलतायेत की कसाऱ्यातून बोलत आहेत?  त्यांच्या मागे बुजगावनं उभं असतं, बुगुबुगु करत एक प्राणी उभा असतो. ही यांची पात्रता, आणि हे आमच्यावर टीका करणार आमच्या परिवारावर टीका करणार यांची लायकी काय? महाराष्ट्रासाठी यांनी काय केलंय आणि मुळात आज होळीचा सण आहे, मजा करा घाणेरडं राजकारण करू नका’ असं खोपकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे भाजपचे नेते कृपाशंकर सिंग यांनी देखील राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे हे भांग पिऊन बोलतात असं त्यांनी म्हटलं होतं. त्याला देखील खोपकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कृपाशंकर यांची राज ठाकरेंवर टीका करण्याची लायकी नाही, असं खोपकर यांनी म्हटलं आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...