AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भुजबळ मंत्री होताच गुणरत्न सदावर्तेंनी जरांगे पाटलांना डिवचलं, पहिली प्रतिक्रिया काय?

छगन भुजबळ यांची पुन्हा एकदा मंत्रिपदी वर्णी लागली आहे, यावर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी भुजबळ यांचं कौतुक करतानाच जरांगे पाटील यांनी डिवचलं आहे.

भुजबळ मंत्री होताच गुणरत्न सदावर्तेंनी जरांगे पाटलांना डिवचलं, पहिली प्रतिक्रिया काय?
| Updated on: May 20, 2025 | 6:33 PM
Share

लोकसभा निवडणुकीत राज्यात बसलेल्या धक्क्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीनं राज्यात जोरदार पुनरागमन केलं होतं. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार पूर्ण बहुमतानं सत्तेत आलं. राज्यात महायुतीच्या उमेदवारांचा तब्बल 232 जागांवर विजय झाला तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावलं लागलं. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आल्यामुळे काही जुन्या चेहऱ्यांना डावलण्यात आलं होतं. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचा देखील समावेश होता.

मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळ चांगलेच नाराज होते. त्यांनी अनेकदा आपली नाराजी बोलून देखील दाखवली होती. मात्र त्यानंतर आता अखेर छगन भुजबळ यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. आज छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी मिळाली आहे, यावर आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले सदावर्ते? 

छगन भुजबळ यांना मंत्री केल्यामुळे महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण आहे. भुजबळसाहेब पुन्हा पदावर आल्याने वाडी तांड्यावर, प्रभू श्री रामांना मानणाऱ्या लोकांध्ये, भगवान बाबांना मानणाऱ्या लोकांमध्ये सर्वांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. भुजबळसाहेब मंत्री झाल्यानं जनतेला समजलं आहे, हे भटक्या विमुक्तांचे सरकार आहे, असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. कायद्याची पायमल्ली करण्याचा प्रयत्न करू नका, भटक्या विमुक्तांना छेडण्याचा प्रयत्न करू नका,  ब्राह्मण आहेत, म्हणून मुख्यमंत्र्यावर चुकीच्या पद्धतीने बोलण्याची तसदी घेऊ नका, असं गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांना म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे भुजबळ मंत्री झाल्यानंतर मंत्री माणिकराव कोकाटे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी भुजबळांचं स्वागत केलं आहे, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, आज भुजबळ यांना न्याय मिळाला, भुजबळांच्या मंत्रिपदाचा फायदा नाशिक आणि महाराष्ट्राला होईल असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल