तरुणाची केशरातून लाखोंची कमाई, केवळ 15×16 रुममध्ये एरोपोनिक शेतीची कमाल
आतापर्यंत या तरुणाने 75 भारतीय आणि अमेरिकन आणि फ्रान्समधील विद्यार्थ्यांना केशर शेती कशी करतात याचे प्रशिक्षण दिले आहे. कोटा कृषी विद्यापीठाने त्याला गेल्यावर्षी इनडोअर केशर फार्मिंगबद्दल मार्गदर्शन देण्यासाठी आमंत्रित केले होते.

नंदूरबार जिल्ह्यातील एका तरुणाने केशराची शेती करुन लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. या तरुणाने आपला अनोखा व्यवसाय सुरु तर केला परंतू इतरांना देखील याचे प्रशिक्षण हा तरुण देत आहे. या तरुणाने अवघ्या 15×16 रुममध्ये एरोपोनिक शेतीचा प्रयोग यशस्वीपणे केला आहे. कश्मिरी केशर महाराष्ट्रात उगवता येईल का? या प्रश्नाचा शोध त्याने सुरु केला आणि त्याला मोठे यश आले. सुरुवातीला त्याने पाच लाखांची गुंतवणूक केली आता त्याची वार्षिक उलाढाल २१ लाखांहून अधिक झाली आहे.
नंदुरबारच्या हर्ष पाटील याचे शिक्षण कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक पर्यंत झाले आहे. कॉर्पोरेट नोकरीऐवजी त्याने स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याचे संपूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून होते, त्यामुळे शेती धंद्याची मूलभूत माहिती त्याला होती. पण टेक्नॉलॉजी आणि शेती एकत्र करून व्यवसाय सुरू कसा करायचा हे त्याला कळत नव्हते.असाच रिसर्च करीत असताना त्याला केशर शेतीबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर त्याच्या मनात विचार चमकला की महाराष्ट्रात कश्मीर येथील केशर पिकविणे शक्य आहे का ? त्यानंतर हर्ष या कन्सेप्टने भारावून गेला.”काश्मीरी केशर महाराष्ट्रात उगवता येईल का?” याच प्रश्नावर त्याने अधिक रिसर्च सुरू केला आणि अशाप्रकारे त्यांच्या पाटील फार्मची सुरुवात झाली.
साल 2023 मध्ये, हर्ष पाटील याने 15×16 च्या रूममध्ये ‘एरोपोनिक’ तंत्राने केशर शेती सुरूवात केली. एरोपोनिक्स म्हणजे मातीशिवाय फक्त हवा आणि धुक्यात झाडांची लागवड करण्याची पद्धत होय. एखाद्या घरात काश्मीरसारखे हवामान तयार करणे हे सर्वात मोठे आव्हान होते. त्यासाठी एअर चिलर, ह्युमिडिफायर आणि PUF पॅनेल्स लावण्यात आले. त्यानंतर या एरोपोनिक्स शेतीतून हर्ष पाटील यांना सुरुवातीला, त्याने 800 रुपये प्रति किलो दराने 200 किलो मोगरा जातीचे केशरचे कंद काश्मीरमधून विकत घेतले आणि सुमारे 5 लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली. पहिल्या सिझनमध्ये त्यांना 300 ग्रॅम केशर मिळाले आहे.




केशरचा रेट 7-8 लाख प्रति किलो
पाटील फार्ममध्ये 1300 स्क्वेअर फूट क्षेत्रावर केशर पिकविले जाते. 2024 मध्ये, हर्षने 2000 किलो कंदांपासून 3 किलो केशरचे प्रॉडक्शन केले. बाजारात केशरचा रेट 7-8 लाख प्रति किलो आहे, तर पाटील फार्ममधील केशरची 700-800 रुपे प्रति ग्रॅम रेटने विक्री होत आहे. आता हर्ष पाटील यांचा वार्षिक रेव्हेन्यू 21 लाखांपेक्षा जास्त झाला आहे. हर्ष इंस्टाग्राम, व्हॉट्सअपसारख्या सोशल मीडियावरून देखील केशरची विक्री करतो. तो ‘Saffron Diaries’ द्वारे माहिती शेअर करतो आणि वीकेंड वर्कशॉप घेत असतो.