AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हातकणंगलेमध्ये मोठा राडा, दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मतदान काही काळासाठी थांबवले

Hatkanangale Lok Sabha constituency: हातकणंगले लोकसभा मतदारसंघात वाळवा तालुक्यातील साखराळे गावात मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार धीर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाला. यामुळे मतदान काही काळासाठी थांबवावे लागले.

हातकणंगलेमध्ये मोठा राडा, दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मतदान काही काळासाठी थांबवले
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 07, 2024 | 2:08 PM
Share

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात काही ठिकाणी गोंधळ, हाणमारी, आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील  हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दोन गटात हाणामारी झाली.  वाळवा तालुक्यातील साखराळे गावात मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार धीर्यशील माने यांच्या कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाला. यामुळे मतदान काही काळासाठी थांबवावे लागले. पोलिसांनी मध्यस्थी करुन दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची समजूत काढली. त्यानंतर पुन्हा मतदान सुरु झाले.

काय घडला प्रकार

वाळवा तालुक्यातील साखराळे गावातील बुथ क्रंमाक 62 आणि 63 वर हा प्रकार घडला आहे. महायुतीचे उमेदवार धर्यशील माने आणि महाविकास आघाडीचे उबाठा गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या दोन गटात जोरात बाचाबाची झाली. त्याचे रुपातंर जोरदार हाणामारीत झाले. मतदान केंद्र क्रमांक 62 आणि 63 वर सत्यजित पाटील सरूडकर यांचे बोगस प्रतिनिधी आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करत धैर्यशील माने यांच्या गटाने मतदान केंद्र काही काळ बंद ठेवले होते. यावरून सत्यजित पाटील सरूडकर याचे कार्यकर्ते आक्रमक होऊन जाब विचारण्यासाठी आले. दोन्ही गटात शाब्दिक वादावादी होऊन जोरदार हाणामारी झाली.

पोलिसांचा हस्तक्षेपामुळे वाद टळला

दोन्ही गटातील वाद वाढू लागल्यानंतर पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केला. यामुले पुढील मोठा अनर्थ टळला आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलिसांचा हस्तक्षेप केल्यानंतर आता सध्या मतदान सुरळीत सुरू आहे. धर्यशील माने गटाचे दत्तात्रेय पाटील यांनी सत्यजित पाटील सरूडकर यांच्या बोगस प्रतिनिधीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हातकणंगले मतदार संघात तिरंगी सामना

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. याठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुतीबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनाही निवडणूक रिंगणात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी उमेदवार आहेत. महायुतीकडून धीर्यशील माने तर महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील सरुडकर उमेदवार आहेत.

Follow Us
आधी वाचलास आता... NCP नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडियो
मोठी बातमी! आधी वाचलास आता... NCP नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडियो क्लीपने खळबळ
आम्ही निवडणुक आयोगाची 'ती' चूक समोर आणली, अपात्रतेबाबत... सुनावणीनंतर
आम्ही निवडणुक आयोगाची 'ती' चूक समोर आणली, अपात्रतेबाबत... सुनावणीनंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... ठाकरेंच्या वकिलांच्या दाव्याने..
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... वकिलांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही...
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही... शिंदे गटातील नेत्याच्या विधानाने खळबळ
आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा
मोठी बातमी! आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा, मात्र शिवसेना कुणाची? ह्यावर सस्पेन्स कायम
अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं
Shivsena SC Hearing | सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा मोठा दावा! अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं
मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्... डार्क वेबचा वापर करून कट?
Nagpur | मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्... वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेकाचं भयनाक कृत्य
विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही; कोर्टात सिब्बल यांचा युक्तिवाद
Shivsena Symbol Hearing Update | विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही; सुप्रीम कोर्टात सिब्बल यांचा सडेतोड युक्तिवाद
विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, मात्र... कपिल सिब्बल
विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, मात्र... कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादाने डाव पलटणार?
सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीत
सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीती