संजय राऊत यांना हेमंत गोडसे यांचे चॅलेंज, गोडसेंचं चॅलेंज राऊत स्वीकारणार ?

किरण बाळासाहेब ताजणे, Tv9 मराठी

Updated on: Dec 03, 2022 | 4:50 PM

संजय राऊत म्हणतात त्यांचा चेहरा नाही तर शिवसेनेचा चेहरा होता, चेहरा नाही तर काम महत्वाचं असत असा पलटवार खासदार हेमंत गोडसे यांनी केला.

संजय राऊत यांना हेमंत गोडसे यांचे चॅलेंज, गोडसेंचं चॅलेंज राऊत स्वीकारणार ?
Image Credit source: Google

नाशिक : उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा विश्वासघात संजय राऊत करत असून त्यांच्या चेहऱ्यामुळे राजकारण मलिन होत असून हिम्मत असेल तर माझ्या समोर येऊन निवडणूक लढा असं आवाहन शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी संजय राऊत यांना केलं आहे. संजय राऊत यांनी हेमंत गोडसे हा काय चेहरा होता का ? अशी टीका करत शिवसेना म्हणजेच चेहरा असल्याचे संजय राऊत यांनी म्हंटले होते. याशिवाय हेमंत गोडसे यांनी तिकडे जाऊन त्यांची राजकीय कबर खोदली असून ते प्यारे झाल्याचे संजय राऊत यांनी हातवारे करत म्हंटलं होतं. त्याच सर्व पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकार परिषद घेत राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. यावेळी गोडसे यांनी संजय राऊत यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण करण्यासाठी आजची पत्रकार परिषद असल्याचे सांगत राऊत यांनी चेहऱ्यावरून केलेली टीका गोडसे यांना चांगलीच जिव्हारी लागल्याचे यातून दिसून आले आहे.

संजय राऊत म्हणतात त्यांचा चेहरा नाही तर शिवसेनेचा चेहरा होता, चेहरा नाही तर काम महत्वाचं असत असा पलटवार खासदार हेमंत गोडसे यांनी केला.

संजय राऊत यांनी राऊत यांनी कधी उद्योजक आणि शेतकऱ्यांची बैठक घेतली, या माणसामुळे संपूर्ण शिवसेनेचे वाटोळं केल्याचा आरोप गोडसे यांनी राऊत यांच्यावर केला.

एकट्या माणसामुळे शिवसेनेची विल्हेवाट लागली, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा विश्वासघात राऊत करतात, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यामुळे राजकारणाची प्रतिमा मलिन होत असल्याचे देखील गोडसे यांनी म्हंटले आहे.

हे सुद्धा वाचा

याशिवाय संजय राऊत यांनी नाशिक मध्ये येऊन निवडणूक लढवून दाखवावीम, हिम्मत असेल तर माझ्या समोर येऊन निवडणूक लढा असं आवाहन देखील गोडसे यांनी राऊत यांना केले आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI