हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीचा जेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न : सूत्र

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याने कारागृहात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी (suicide attempt by Hinghanghat accused) दिली आहे.

suicide attempt by Hinghanghat accused, हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीचा जेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न : सूत्र

वर्धा : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याने कारागृहात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी (suicide attempt by Hinghanghat accused) दिली आहे. आरोपीने कारागृहातच गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे उद्या (20 फेब्रुवारी) आरोपीची न्यायालयात सुनावणी (suicide attempt by Hinghanghat accused) होणार आहे.

आरोपी विकेशने 17 फेब्रुवारीला रात्री ब्लँकेटच्या सहाय्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सध्या विकेश नागपूरच्या अंडासेलमध्ये आहे. विकेशची न्यायालयीन कोठडी संपणार असून व्हिडीओ कॉन्फरन्सने विकेशला न्यायालयात उद्या हजर करणार असल्याची माहिती मिळत आहे.

नुकतेच काही दिवसांपूर्वी आरोपी विकेशने 24 वर्षीय शिक्षिकेवर पेट्रोल टाकून तिला जाळले होते. यामध्ये ती 20 ते 30 टक्के भाजली होती. पण उपचारादरम्यान शिक्षिकेचा मृत्यू झला.

काय आहे हिंगणघाट जळीतकांड प्रकरण?

24 वर्षीय शिक्षिका दररोज सकाळी कामावर जाताना आरोपी विकेश उर्फ विकी नगराळे तिचा पाठलाग करायचा. सोमवार 3 फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे शिक्षिका कॉलेजमध्ये शिकवायला जात असताना आरोपी तिचा पाठलाग करत होता. हिंगणघाट शहरातील एका चौकात येताच सकाळी 7.15 वाजताच्या सुमारास आरोपीने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती 20 ते 30 टक्के भाजली होती. तिचा चेहरा जळाल्यामुळे तिच्यावर अनेक शस्त्रक्रियाही करण्यात आल्या.

पोलिसांनी आरोपीकडून घटनेत वापरण्यात आलेलं साहित्यही जप्त करण्यात आलं आहे. यात त्याचा मोबाईल, लायटर, कपडे, दुचाकी, शूज आणि पेट्रोलची छोटी बॉटल याचा समावेश आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्याला जिल्ह्याच्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये नेत तपास केला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *