हिंगोली जिल्हा 4 वाजता 'कोरोना'मुक्त, 8.30 वाजता सहा नवे रुग्ण

हिंगोली जिल्ह्यात एसआरपीएफच्या 6 जवानांना कोरोनाची लागण झाlल्याचं समोर आलं आहे. (Hingoli State Reserve Police Force Jawans Test Positive for Corona)

हिंगोली जिल्हा 4 वाजता 'कोरोना'मुक्त, 8.30 वाजता सहा नवे रुग्ण

हिंगोली : हिंगोली जिल्ह्याची ‘कोरोना’मुक्ती औटघटकेची ठरली. कारण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दुपारी चार वाजता हिंगोली जिल्हा ‘कोरोना’मुक्त झाल्याची घोषणा केली, मात्र अवघ्या साडेचार तासात सहा नवे रुग्ण आढळले आहेत. एसआरपीएफच्या 6 जवानांना कोरोनाची लागण झाlल्याचं समोर आलं आहे. (Hingoli State Reserve Police Force Jawans Test Positive for Corona)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दुपारी पत्रकार परिषद घेत हिंगोलीसह राज्यातील चार जिल्ह्यात गेल्या 14 दिवसांपासून एकही कोरोनाग्रस्त रुग्ण न सापडल्याची गुड न्यूज दिली होती. मात्र राज्य राखीव पोलिस दलाच्या सहा जवानांचे ‘कोरोना’ रिपोर्ट काल रात्री पॉझिटिव्ह आले. त्यामुळे हिंगोलीवासियांचं कोरोनामुक्त झाल्याचं स्वप्न अवघ्या काही तासातच विरलं.

हेही वाचातीन वर्षांचे बाळ ते 92 वर्षीय आजी, पुण्यात 15 जणांच्या कुटुंबाची ‘कोरोना’वर मात

मालेगाव आणि मुंबईतून दोन दिवसांपूर्वी हे जवान हिंगोलीत आले होते. 194 जवानांना दोन दिवसांपासून क्वारंटाइन करुन ठेवण्यात आलं आहे. 101 जवानांचे अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाले. त्यापैकी 95 जवानांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले, हा दिलासा असला, तरी आणखी 93 जवानांचे अहवाल प्रलंबित असल्याने धाकधूक कायम आहे.

हिंगोली जिल्ह्यातील पहिल्या कोरोना रुग्णाचा रिपोर्ट 16 एप्रिलला निगेटिव्ह आला होता. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. हिंगोली जिल्हाच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली होती. ‘ही बाब दिलासादायक आहे. जिल्हा प्रशासन चांगली कामगिरी बजावत आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या सहकार्यबद्दल मी ऋणी आहे’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या. (Hingoli State Reserve Police Force Jawans Test Positive for Corona)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *