Video: पेट्रोल भरुन मुख्य रस्त्यावर येताना जोरदार धडक! नवरा-बायको दुचाकीवरुन थेट रस्त्यावर आदळले

Hingoli Road accident CCTV: रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला न पाहताच दाम्पत्याची दुचाकी मुख्य रस्त्यावर येण्यासाठी निघाली.

Video: पेट्रोल भरुन मुख्य रस्त्यावर येताना जोरदार धडक! नवरा-बायको दुचाकीवरुन थेट रस्त्यावर आदळले
हिंगोलीतील थरकाप उडवणारा भीषण अपघातImage Credit source: Twitter Video Grab
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 5:24 PM

हिंगोली : रस्ते अपघातांची (Hingoli Bike Accident) तीव्रता कधी कमी होणार, असा प्रश्न सातत्यानं उपस्थित होतोय. अशातच रोज नवनवे अपघाताचे सीसीटीव्ही व्हिडीओ समोर येत असतात. दरम्यान, हिंगोली असाच काळजाचा थरकाप उडवणारा एक भयंकर अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV of road Accident) कैद झाला. या अपघात पाहून अंगावर काटा येईल. नवरा बायको दुचाकीवरुन जाण्यासाठी निघाले. मुख्य रस्त्यावर येताच या दाम्पत्याच्या दुचाकीला मुख्य रस्त्यावरुन जाणाऱ्या दुचाकीनं जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीचालकांचं डोकं थेट रस्त्यावर आदळलं आणि महिलाही दुसरीकडे फेकली गेली. या अपघातानंतर दोन्ही बाईक (Bike Accident) रस्त्याच्या दुतर्फा फेकल्या गेल्या होत्या. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरुन रस्ता पार करत असताना हा भीषण अपघात घडला.

भयंकर!

या भीषण अपघातात दुचाकीवरुन सगळेच जण जखमी झाले आहेत. दाम्पत्य जेव्हा पेट्रोल भरुन मुख्य रस्त्यावर येण्यासाठी बाहेर पडलं, तेव्हा थोडाशा नजरचुकीमुळे हा भयंकर अपघात घडला.

रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला न पाहताच दाम्पत्याची दुचाकी मुख्य रस्त्यावर येण्यासाठी निघाली. दरम्यान, विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला नियंत्रण न राखता आल्यानं दोन्ही बाईक एकमेकांना जोरदार धडकल्या.

…महिला बालंबाल बचावली

ही धडक इतर जबरदस्त होती, ती दुचाकीवरील दाम्पत्य पूर्णपणे गोल फिरुन रस्त्यावर आदळलं. तर धडक देणाऱ्या दुचाकीचा चालकही रस्त्यावर समोरच्या बाजूला फेकला गेला. थेट तोंडवर आपटल्यामुळे दुसऱ्या दुचाकीवरील चालकालाही गंभीर दुखापत झाली. हा अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. या अपघातात बाईकवर बसलेल्या महिला बालंबाल बचावली आहे. ही महिला अपघातानंतर आपल्या पतीला नेमकं कुठे लागलंय, हे पाहण्यासाठी रस्त्यावरुन उठून पाहण्यासाठी गेल्याचंही दिसून आलंय.

कधी घडला अपघात?

हा अपघात गुरुवारी (14 एप्रिल) रोजी घडला. सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांची अपघाताची ही घटना घडली. रस्त्याच्या शेजारी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा संपूर्ण अपघात कैद झाला आहे. धक्कादायक म्हणजे या दोन्हीही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेलं नव्हतं. त्यामुळे या अपघाताची तीव्रता अधिकच वाढली. हिंगोलीच्या जवळाबाजार येथे हिंगोली-परभणी या राज्य महामार्गावर हा भीषण अपघात झाला.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Video | 130च्या स्पीडनं बाईक चालवणं महागात पडलं, रस्त्याच्या मधोमध कारला सुपरबाईकची धडक!

Video | भरधाव वेगात दुचाकी, थेट दुभाजकावर आदळल्याने दोघांचाही मृत्यू, थरकाप उडवणारा अपघात कॅमेऱ्यात कैद

Video | बाईकवरुन युटर्न घेत होते, भरधाव एसटी दिसलीच नाही, जे घडलं, ते भयाण होतं!

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.