Video | 130च्या स्पीडनं बाईक चालवणं महागात पडलं, रस्त्याच्या मधोमध कारला सुपरबाईकची धडक!

Video | 130च्या स्पीडनं बाईक चालवणं महागात पडलं, रस्त्याच्या मधोमध कारला सुपरबाईकची धडक!
भरधाव सुपरबाईकची कारचा समोरासमोर धडक

Superbike Accident caught on Camera : भरधाव वेगानं दुचाकी चालवणाऱ्या चालकाचा हेल्मेट, बाईट सेफ्टी कीट असं सगळं सोबत असूनही जागीच जीव गेला आहे. याला कारण ठरलं आहे, बाईकचा महाप्रचंड वेग!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 23, 2022 | 6:46 PM

वेगान (Speeding) गाडी चालवणं हे धोकादायक असतं, यात वादच नाही. अशाच एक भयंकर अपघात भरधाव वेगानं दुचाकी चालवणाऱ्या तरुणासोबत घडला आहे. या संपूर्ण अपघाताआधी तरुण गाडी ज्या बेदरकारपणे चालवत होता, ते देखील कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं आहे. अमेरीकेतल्या लॉस एन्जेलेसमध्ये ही धक्कादायक आणि थरारक घडना घडली असून दोघांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. सुपरबाईकवरुन (Superbike) जात असलेला एका तरुण भरधाव वेगानं दुचाकी चालवत असल्याचं दिसल्यानंतर हेलिकॉप्टरमधून त्याला ट्रॅक करण्यात आलं. पण यानंतर एक विचित्र अपघात घडला. रस्त्याच्या मधोमध या भरधाव सुपरबाईकनं समोरासमोर धडक दिली. हा अपघात (Major Accident) इतका भीषण होता, की यात कारचालकासह दुचाकी चालकही दगावला आहे. अमेरिकेतत घडलेल्या या अपघाताची तीव्रता किती भीषण होती, हे व्हिडीओतून समोर आलं आहे.

संपूर्ण घटनेचा व्हिडीओही समोर!

लॉस एन्जेलिसच्या वेस्ट हिल्समध्ये ही धक्कादायक घटना घडली. दुचाकीस्वार प्रचंड स्पीडनं बाईक चालवताना कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्याला ट्रॅकही केलं जात होतं. दरम्यान, भरधाव वेगानं दुचाकी चालवणाऱ्या चालकाचा हेल्मेट, बाईट सेफ्टी कीट असं सगळं सोबत असूनही जागीच जीव गेला आहे. याला कारण ठरलं आहे, बाईकचा महाप्रचंड वेग!

ताशी 130 किलोमीटर वेगानं बाईक पळवणाऱ्या या दुचाकीस्वाराच्या अचानक समोर एक कार आली. यावेळी बाईक कंट्रोल न झाल्यानं एक भीषण अपघात घडला. कारला समोरासमोर बाईकची धडक बसली. या अपघातात दोघांचा बळी गेलाय.

दोघांचा मृत्यू एक गंभीर जखमी

या घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. बाईकचा वेग कशा पद्धतीनं हा दुचाकीस्वार वाढवत गेला, ते देखील व्हिडीओत कैद झालं आहे. Fox 11 Los Angeles या युट्युब चॅनेलवर हा संपूर्ण घटनेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. एक मिनिटं 35 सेकंदाच्या या व्हिडीच्या अखेरच्या सेकंदाला बाईक कारला धडकल्याचं दिसून आलंय. त्यानंतर हा व्हिडीओ लगेचच संपतो.

बाईक कारला धडकल्यानंतर नेमकं काय झालं, हे कळू शकलेलं नाही. 21 जानेवारीला हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला असून, ही घटनादेखील त्याच दिवशी झाली असल्याचं सांगितलं जातंय. या अपघातातील गंभीर जखमी झालेल्या एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

पाहा व्हिडीओ –

संबंधित बातम्या :

मरतानाही एकमेकांना घट्ट धरून ठेवलं, वयोवृद्ध दाम्पत्यांचा एकमेकांना बिलगलेला मृतदेह पाहून काळजात चर्रर्र

2 दिवसांपूर्वी स्कॉर्पिओच्या अपघातात तिघे दगावले! आता एकाला ट्रकनं चिरडलं, सोलापुरात अपघातांची मालिका

लग्नाचे कपडे विसरले म्हणून माघारी फिरला, कारचा वेग ताशी 110, औरंगाबादेत लग्नघरी शोककळा!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें