अखेर पुण्यात सापडलेली सोन्याची नाणी साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयात दिसणार

पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात चिखली येथे घराचे खोदकाम करताना सापडलेली 216 सोन्याची नाणी साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयात ठेवण्यात आली आहेत.

अखेर पुण्यात सापडलेली सोन्याची नाणी साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयात दिसणार

सातारा : पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात चिखली येथे घराचे खोदकाम करताना सापडलेली 216 सोन्याची नाणी साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. या सोन्याच्या नाण्यांचा साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी संग्रहालयात लखलखाट होणार आहे. सुमारे 2 किलो 357 ग्रॅम इतके वजन असलेल्या या सोन्याच्या नाण्यांची किंमत बाजारभावानुसार दीड कोटीच्या घरात आहे. ही नाणी सुमारे सन 1835 ते 1889 या कालावधीतील सिराज उद्दीन महमंद शहा बहाद्दुर दुसरा याच्या राजवटीतील असण्याचा अंदाज आहे. एवढ्या मोठ्या रकमेची ही नाणी सुरक्षित ठेवण्यासाठी या वस्तूसंग्रहालयात विशेष सुरक्षा व्यवस्था केली जाणार आहे (Historical Golden coin from Pune are transfer to Chhatrapati Shivaji Maharaj Museum Satara).

संग्रहालयाचे अभिरक्षक प्रविण शिंदे म्हणाले, “ही सोन्याची नाणी शुक्रवारी (13 मार्च) आमच्याकडे जमा करण्यात आली. पिंपरी चिंचवडमध्ये घराचं बांधकाम करताना ही नाणी एका मजुराला सापडली. त्या मजुराने ही नाणी जप्त करुन ताब्यात घेतली. पुरातत्व विभागाचे संचालक गर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक संचालक विलास वाणे यांनी नाणी ताब्यात घेतली. आता ही नाणी सातारा संग्रहालयात जमा करण्यात आले. यात 216 नाणी असून त्यांचं वजन 2 किलो 365 ग्रॅम आहे. ही नाणी 17 व्या, 18 व्या शतकातील आहेत. दुसरा सिराजउद्दोला यांच्या राज्यातील ही नाणी असावीत असा अंदाज आहे.”

पिंपरी चिंचवडमध्ये पुरातन सोन्याची नाणी अखेर पोलिसांच्या ताब्यात

तब्बल 4 महिन्यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांना इतिहासकालीन सोन्याची नाणी हस्तगत करण्यात यश आलंय. 2 किलो 350 ग्रॅमची तब्बल 216 सोन्याची नाणी आहेत. त्यावर राजा मोहंमद शाह यांची मुद्रा असून उर्दू आणि अरबी भाषा कोरलेली आहे. इसवी सन 1720 ते 1750 या कालखंडातील असल्याचा दावा पुरातत्व विभागाने केलाय.

ही नाणी कधी सापडली?

ही सर्व नाणी 4 महिन्यांपूर्वी एका बांधकामाच्या खोदकामात आढळली होती. सद्दाम पठाणचे सासरे मुबारक शेख आणि मेव्हणा इरफान शेख या दोघांना ती आढळली. पण त्यांनी सद्दामच्या घरातच ठेवली. नंतर याची वाटणी करण्यावरून वाद झाला अन याची खबर पोलिसांना लागल्याने त्यांचं बिंग फुटलं. बाजार भावानुसार एका नाण्याची किंमत 60 ते 70 हजार रुपये असावी. मात्र, याचं ऐतिहासिक महत्व पाहता त्यासाठी अनेकांनी मोठी किंमत मोजली असती, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

हेही वाचा :

तिकडे काँगोत सोन्याचा डोंगर, इकडे पिंपरीत सोन्याच्या नाण्यांचा ढिग

आंग सान सू की यांच्यावर म्यानमार सैन्याकडून सर्वात मोठा आरोप, 11 किलो सोनं आणि कोट्यावधींच्या लाचेचा दावा

धक्कादायक ! मॅनहोलमध्ये लपलंय काय? तब्बल 21 लाखांचं सोनं, पोलीसही हैराण

व्हिडीओ पाहा :

Historical Golden coin from Pune are transfer to Chhatrapati Shivaji Maharaj Museum Satara

Published On - 1:45 am, Sun, 14 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI