आंग सान सू की यांच्यावर म्यानमार सैन्याकडून सर्वात मोठा आरोप, 11 किलो सोनं आणि कोट्यावधींच्या लाचेचा दावा

म्यानमारच्या (Myanmar) सैन्याने आंग सान सू की (Aung San Suu Kyi) यांच्यावर आतापर्यंतचा सर्वात मोठा आरोप केलाय.

आंग सान सू की यांच्यावर म्यानमार सैन्याकडून सर्वात मोठा आरोप, 11 किलो सोनं आणि कोट्यावधींच्या लाचेचा दावा
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Mar 12, 2021 | 4:37 PM

Myanmar Army Accuses Aung San Suu Kyi of Taking Bribe नेप्यिडॉ : म्यानमारच्या (Myanmar) सैन्याने आंग सान सू की (Aung San Suu Kyi) यांच्यावर आतापर्यंतचा सर्वात मोठा आरोप केलाय. आंग सान सू की यांनी 6 लाख डॉलर (जवळपास 4 कोटी 36 लाख रुपये) आणि 11 किलो सोन्याची लाच घेतल्याचा दावा सैन्याने केल्यानं खळबळ उडाली आहे. असं असलं तरी म्यानमार सैन्याने लोकशाही मार्गाने आलेलं सरकार उलथून टाकत सत्तेवर कब्जा केल्याने जगभरात टीकाही होत आहे. विशेष म्हणजे सैन्याने 1 फेब्रुवारी रोजी सत्तापालट केल्यावर (Myanmar Coup) देशातील प्रमुख नेत्यांना अटक केलीय. तसेच अनेक सामान्य आंदोलक नागरिकांची हत्या केल्याचाही आरोप होतोय.

आंग सान की यांचा पक्ष नॅशनल लीग ऑफ डेमोक्रसीने (National League For Democracy) नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यानंतर सैन्याने सत्तापालट केल्याने संपूर्ण म्यानमारमध्ये सैन्याविरोधात आंदोलनं होत आहेत. यानंतर आता सैन्याने आंग सान की यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केलेत, मात्र अद्याप याबाबत सैन्याकडून कोणताही पुरावा सादर करण्यात आलेला नाही. आंग यांच्या पक्षातीलच एका नेत्याने देखील आंग सान यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप केलाय. दुसरीकडे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार तपास अधिकाऱ्याने (UN human rights investigator) म्यानमार सैन्यावर मानवाधिकारांच्या हननाचा गंभीर आरोप केलाय.

जागतिक पातळीवर म्यानमारवर हत्याऱ्यांचा ताबा असल्याचा आरोप

थॉमस अँड्रयू यांनी जिनेव्हातील संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत बोलताना म्यानमारमध्ये सध्या हत्याऱ्यांचा ताबा असल्याचा गंभीर आरोप केलाय. ते म्हणाले, “म्यानमारमध्ये सध्या ‘हत्यारं सरकारचा बेकायदेशीर ताबा आहे. सैन्याकडून नियोजनबद्धपणे आणि व्यापक पातळीवर हत्या केल्या जात आहेत. सामान्य नागरिकांचा छळ केला जातोय.”

विशेष म्हणजे म्यानमारमध्ये होत असलेल्या मानवाधिकारांचं उल्लंघन आणि नागरिकांच्या छळाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था एम्नेस्टीने देखील दुजोरा दिलाय. एम्नेस्टीने म्यानमारच्या सैन्यावर नागरिकांच्या हत्येचा आरोप केलाय (Myanmar Military Accuses Aung San Suu Kyi of Taking Bribe).

आर्थिक निर्बंध लादण्याची मागणी

अँड्रयू म्हणाले, “म्यानमारचं सैन्य सरकार (जुंटा) आणि सैन्याच्या ताब्यातील म्यानमार तेल आणि गॅस कंपनीवर निर्बंध लादावेत. यावर्षी या कंपनीचे आर्थिक व्यवहार 1 बिलियन डॉलरपर्यंत पोहचलेत. याशिवाय सैन्याचे नवे नेते आणि इतर तीन कंपन्यांवरही निर्बंध लादण्यात यावेत.”

सैन्याने गुरुवारी (11 मार्च) 7 पेक्षा अधिक जणांची हत्या केल्याचा आरोप आहे. आतापर्यंत मरणाऱ्यांची संख्या 70 पेक्षा अधिक झालीय. सैन्याने आंदोलन करणाऱ्याने थेट लक्ष्य केलंय. काहींच्या तर डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्यात. आपण शांततापूर्ण आंदोलन करत असतानाही सैन्य अत्याचार करत असल्याचा स्थानिक नागरिकांना आरोप केलाय.

हेही वाचा :

Special Story | म्यानमारमध्ये लोकशाहीला सुरुंग! लष्कराचा उठाव, भारतावर काय परिणाम?

26 वर्षांची हुकूमशाही ते एका महिलेनं आणलेली लोकशाही, पुन्हा सैन्यअधिपत्याखाली गेलेल्या म्यानमारची सगळी कहाणी!

ना तो फार बोलतो, ना शिकण्यात तेज होता, आता थेट म्यानमारमध्ये तख्तापलट करणाऱ्या जनरलची संपूर्ण कहाणी

व्हिडीओ पाहा :

Myanmar Army accuses Aung San Suu Kyi of taking gold and crores of Bribe

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें