लॉकडाऊन काळात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करणार : गृहमंत्री अनिल देशमुख

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारकडून 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Anil Deshmukh on women molestation) आहे.

लॉकडाऊन काळात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करणार : गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारकडून 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Anil Deshmukh on women molestation) आहे. पण काही विकृत प्रवृत्तीचे लोक या लॉकडाऊनच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन महिलांवर अत्याचार करत आहेत. लॉकडाऊन काळात सध्या महिला अत्याचाऱ्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. या तक्रारींची अतिशय गंभीर दखल घेऊन अधिक कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh on women molestation) यांनी दिला आहे.

“या काळात आपल्याला कोण अटक करणार? असा उद्दामपणा करीत महिलांवर अत्याचाराचे प्रकार होत आहेत. एकट्या स्त्रियांना त्रास देणे, त्यांचा विनयभंग करणे असे प्रकार जिथे घडतील तिथे कुठलाही मुलाहिजा न ठेवता अधिक कठोर कारवाई केली जाईल. घरगुती हिंसाचाराच्या (डोमेस्टिक व्हायलन्स) घटनांचीही अतिशय गंभीर दखल घेतली जाईल”, असंही अनिल देशमुख यांनी सांगितले.

“सध्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन कुणीही स्त्रियांचा छळ केल्यास पोलिसांनी अत्यंत कठोर कारवाई करावी असे आदेश आपण दिले आहेत. शासन अशा पीडित स्त्रियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील”, असं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

“घरगुती किंवा अन्य कोणत्याही हिंसाचाराविरुद्ध महिलांना न्याय देणारा कायदा कठोर आहे आणि त्याची अंमलबजावणी तितक्याच कठोरपणे केली जाईल. महिलांना सन्मानाची वागणूक कशी मिळेल हे पुरुष मंडळींनी बघावे. तसे न झाल्यास कायद्याचा बडगा उगारावाच लागेल”, असा इशारा गृहमंत्र्यांनी दिला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *