पुण्याच्या नवले पुलावर भीषण अपघात, दोन ट्रक अन् कारच्या अपघातात 8 जणांचा मृत्यू
मोठी बातमी समोर येत आहे, पुण्यातील नवले पुलावर दोन ट्रक आणि एका कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर ट्रकला आग लागल्याची घटना घडली, या अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे, पुण्याच्या नवले पुलावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर दोन ट्रकला आग लागली असून, या दोन ट्रकच्यामध्ये एक कार अडकली आहे. या अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार नवले पुलावर दोन ट्रकची समोरा समोर धडकी झाली, त्यानंतर या दोन ट्रकच्यामध्ये एक कार अडकल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर दोन्ही ट्रकने पेट घेतला आहे. साताऱ्याच्या दिशेकडून पुण्याकडे येणाऱ्या दोन ट्रकचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन ट्रकच्यामध्ये एक चारचाकी वाहन अडकल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातानंतर या दोन्ही ट्रकला आग लागली, या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या आणखी वाढू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे, या अपघातामध्ये 16 जण जखमी झाले आहेत.
अपघातामुळे वाहतूक कोंडी
दरम्यान दोन ट्रक आणि एका कारचा अपघात झाल्यामुळे हा रस्ता आता वाहतुकीसाठी बंद झाला आहे, त्यामुळे या परिसरात प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे, वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हात सुरू आहेत. या अपघातामध्ये तीनही वाहनांचं प्रचंड नुकसान झालं आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. मात्र अजूनही ही कार या दोन्ही ट्रकच्यामध्ये अडकलेलीच आहे, तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न आता अग्निशमन दल आणि पुणे पोलिसांकडून सुरू आहे.
गोंदियामध्ये रुग्णवाहिकेत स्फोट
दुरुस्तीसाठी गेलेल्या रुग्णवाहिकेला आग लागून रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याने दुकानासह घरांचेही नुकसान झाल्याची घटना गोंदियाच्या मुंडीपार परिसरात घडली आहे. स्फोट इतका भीषण होता की परिसरातील दुकानांचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. 108 क्रमांकाची ही रुग्णवाहिका देवरी तालुक्यातील चिचगढ ग्रामीण रुग्णालयाची असल्याची माहिती मिळाली असून, चालकाने ती वर्कशॉपमध्ये दुरुस्तीसाठी नेली होती. दरम्यान वर्कशॉप जवळ गेल्यानंतर रुग्णवाहिका उभी केली असता तीला अचानक आग लागली आणि त्यातच ऑक्सिजन सिलेंडरचा भीषण स्पोट झाला, या आगीमध्ये ही रुग्णवाहिका जळून खाक झाली आहे.
