घरभाडं न दिल्याने मालकाचा महिलेवर बलात्कार

घरभाडं न दिल्याने मालकाचा महिलेवर बलात्कार

नागपूर : घरभाडं न दिल्याने महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना क्राईम सिटी नागपुरात घडली आहे. तर दुसरीकडे पीडित महिलेला कर्ज चुकविण्यासाठी एका महिलेनेच देहव्यापार करण्यास भाग पडल्याची तक्रार पीडित महिलेने दिली आहे. नागपूर पोलिसांनी या तक्रारीनंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक टंचाईमुळे या पीडितेला दोन दोन अत्याचार सहन करावे लागले.

नागपुरात पीडित महिला काही महिन्यांपासून घर भाड्याने घेऊन राहत होती. आर्थिक टंचाईमुळे ती घराचं भाडं देऊ शकली नाही. पतीची तब्येतही बिघडलेली होती. त्यामुळे पीडित महिलेने एका दुसऱ्या महिलेच्या माध्यमातून दुसऱ्याकडून कर्ज घेतलं होतं.

हे कर्ज चुकवता आलं नाही. पण मध्यस्थी करणाऱ्या महिलेने पीडितेला देह व्यापार करण्यास भाग पाडलं. देहव्यापार केल्यास कर्ज चुकवावं लागणार नाही असं सांगितलं. तर दुसरीकडे घरमालकाने भाड्याच्या पैशांसाठी तगादा लावत तिच्यावर बलात्कार केला. याबाबतची तक्रार देण्यात आली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर आता मध्यस्थी करणाऱ्या महिलेचा शोध सुरु आहे.

पीडित महिलेच्या गरीबीचा फायदा मध्यस्थी महिलेने आणि घरमालकाने घेऊन हा घृणास्पद प्रकार केला असल्याने मोठी खडबड माजली आहे. महिला आणि तिचा पती हा मध्य प्रदेशातील असून ते कामाच्या शोधात नागपुरात आले होते. मात्र तिच्यावर ही परिस्थिती ओढावल्याने तिचा फायदा घेण्यात आल्याचं महिलेने पोलिसांना सांगितलं. या प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत.

नागपूरची क्राईम सिटी अशी ओळख बनली आहे. महिला आणि सर्वसामान्य सुरक्षित नाहीतच. शिवाय परराज्यातील मजूर कामाच्या शोधात महाराष्ट्रात येतात. त्यांच्यावरही अत्याचार करण्याची विकृत मानसिकता नागपुरात होत चालल्याचं यातून समोर आलंय.

Published On - 4:11 pm, Fri, 21 December 18

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI