मुंबई : सद्यस्थितीत राज्य सरकारला आरक्षणाच्या मागण्यांसाठी विविध समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागताना दिसतोय, दुसरीकडे मुस्लीम समाज आरक्षणासाठी आक्रमक झालाय, तर धनगर समाजानेही अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा यासाठी मागणी तीव्र केली आहे. ‘येळकोट, येळकोट जय मल्हार’ असा नारा म्हणणारा प्रमुख समाज म्हणजे धनगर समाज…श्री क्षेत्र जेजुरी येथील खंडोबा हे धनगरांचे मुख्य दैवत मानलं जातं. धनगर समाज हा एक आदिम मेंढपाळीचा व्यवसाय करणारा समाज असून महाराष्ट्रातील विठ्ठल, खंडोबा, ज्योतिबा, मायाक्का ही दैवते या समाजातूनच आली आहेत.