AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खडसेंच्या जावयाच्या अडचणी वाढल्या, प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये काय -काय सापडलं? गिरीश महाजनांनी सगळं सांगितलं

काही दिवसांपूर्वी पुण्याच्या खराडीमध्ये सुरू असलेल्या रेव्हा पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता, या प्रकरणात प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

खडसेंच्या जावयाच्या अडचणी वाढल्या, प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये काय -काय सापडलं? गिरीश महाजनांनी सगळं सांगितलं
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 17, 2025 | 2:55 PM
Share

काही दिवसांपूर्वी पुण्याच्या खराडीमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता, या प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे, ते सध्या जेलमध्ये आहेत. या प्रकरणात आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

दरम्यान तीन दिवसांपूर्वी प्रांजल खेवलकर यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंध ठेवताना आपला चोरून व्हिडीओ काढल्याची तक्रार एका महिलेनं सायबर पोलिसांकडे केली होती, या तक्रारीवरून प्रांजल खेवलकर यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे खेवलकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान आता या प्रकरणावर पुन्हा एकदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले महाजन? 

पाच ते सहा जणांचे जे साहित्य जप्त करण्यात आलं होतं, ते  व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग पोलिसांनी कोर्टासमोर ठेवल्या आहेत. यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खेवलकरांच्या मोबाईलमध्ये काय-काय आहे? हे पत्रकार परिषदेमधून मांडलं. चौदाशे ते सतराशे व्हिडिओ. ऑडिओ रेकॉर्डिंग प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये आहेत, असं महाजन यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, अनेक तरुणींना आमिष दाखवून त्यांच्यावर अन्याय, अत्याचार करण्यात आला आहे.  त्यातील आता कोण तक्रार करणार कोण करणार नाही हे आपण सांगू शकत नाही. आपण सांगितल्याप्रमाणे त्या प्रकरणात एक दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत.  या रेकॉर्डिंगमध्ये त्या आहेत की नाही? यासंदर्भात पोलीस चौकशी करत आहेत.

एवढ्या मुलींना विवस्त्र करून जर रेकॉर्डिंग करत असेल तर हा कसला भाग म्हणावा? प्रज्वल रेवनाने एक-दोन महिलांना विवस्त्र करून त्यांचे व्हिडिओ काढले त्यांना जन्मठेप झाली. हा कोणता प्रकार आहे? 300 च्या वर मुली याबाबत सांगत आहेत, तशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे. तपास सुरू आहे, तपास झाल्यानंतर जो निर्णय व्हायचा तो होईल. आज त्या प्रकरणावर टिका टिपणी करणे योग्य नाही. या प्रकरणावर एसआयटी नेमण्याची मागणी करण्यात आली आहे, ती मागणी रुपाली ताईंनी केली आहे.  मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत याबाबतीत ते निर्णय घेतील, योग्य ती चौकशी निपक्षपणे होईल, असं महाजन यांनी म्हटलं आहे.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.