Explainer : ग्रामपंचायतीचं बजेट किती? सरकारनं दिलेला निधी कुठे खर्च केला, हे कसं पाहायचं..?

केंद्र सरकार, राज्य सरकार आणि इतर अशा मिळून सुमारे 1140 योजना एका गावासाठी उपलब्ध आहेत. परंतु, त्या त्या गावाची लोकसंख्या, जिल्हा, भौगोलिक क्षेत्र यानुसार त्या गावासाठी कोणती योजना उपयुक्त आहे ते ठरवलं जातं.

Explainer : ग्रामपंचायतीचं बजेट किती? सरकारनं दिलेला निधी कुठे खर्च केला, हे कसं पाहायचं..?
Maharashtra Village
Follow us
| Updated on: Jan 02, 2024 | 8:16 PM

मुंबई | 2 जानेवारी 2024 : केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार गावांच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे वेळोवेळी सांगतात. राज्य सरकार अर्थ संकल्पामधून निरनिराळ्या योजना जाहीर करते. त्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येते. यातील जास्तीत जास्त योजना या गावांच्या विकासासाठी असतात. मात्र, राज्यातील गाव, खेड्याची परिस्थिती पाहिल्यास खरंच गावच्या विकासकामासाठी निधी मिळतो का? मिळतो तरी किती? आणि त्यातील किती निधी ग्रामपंचायत खर्च करते? असे प्रश्न उभे राहतात. या प्रश्नांची उत्तरे आता तुम्हालाही सहजरीत्या मिळू शकतात कसे ते पाहा.

प्रत्येक वर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात ग्रामविकास समितीची बैठक घेतली जाते. या बैठकीमध्ये आरोग्य, शिक्षण, गावातील सोईसुविधा यावर चर्चा होते. आवश्यक त्या गरजा पूर्ण करण्यासाठी किती निधी शिल्लक आहे आणि कामांसाठी किती निधी लागेल याचे अंदाज पत्रक तयार केले जाते. गावाने तयार केलेलं हे अंदाजपत्रक पुढे पंचायत समितीकडे पाठविले जाते आणि पंचायत समिती ते राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवते.

केंद्र सरकार, राज्य सरकार आणि इतर अशा मिळून सुमारे 1140 योजना एका गावासाठी उपलब्ध आहेत. परंतु, त्या त्या गावाची लोकसंख्या, जिल्हा, भौगोलिक क्षेत्र यानुसार त्या गावासाठी कोणती योजना उपयुक्त आहे ते ठरवलं जातं. जर योजन राज्यसरकारची असेल तर त्यासाठी १०० टक्के निधी दिला जातो. पण ती योजना जर केंद्र सरकारची असेल तर त्यासाठी गावाला केंद्राचा 60 तर राज्याचा 40 टक्के निधी मिळतो. 15 व्या वित्त आयोगानुसार गावातील प्रत्येक माणसासाठी सरकार प्रति वर्षी 957 रुपये गावाला देते. यातील पाणीपुरवठा, स्वछता यासाठी 50 टक्के तर उर्वरित 50 टक्के इतर बाबींवर खर्च करण्यात येतो.

तुमच्या गावाला किती निधी मिळाला हे कसे कळेल?

तुमच्या गावासाठी सरकारने निधी दिला. पण, सरपंच आणि ग्रामपंचायतीने हा निधी कोणत्या कामासाठी आणि कुठे वापरला हे आता तुम्हाला सहजरीत्या कळेल. यासाठी मोबाईलवर गुगल प्ले स्टोअरवरून ‘ई-ग्राम स्वराज’ हे एप्लिकेशन घ्यावे लागेल. यामध्ये पहिले राज्य, त्यानंतर जिल्हा परिषदमध्ये जिल्हा, ब्लॉक पंचायतमध्ये तालुका आणि व्हिलेज पंचायतमध्ये गावाचे नाव निवडा. त्यानंतर सबमिटवर क्लिक करा.

एक नवीन पेज ओपन होईल. येथे तुम्हाला गावच्या कोड नंबरसह आर्थिक वर्षाच माहिती दिसेल. कोणत्याही वर्षाची माहिती तुम्ही येथे पाहू शकता. ER Details यामध्ये निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची माहिती, Approved activities मध्ये कोणत्या कामांसाठी किती निधी मंजूर करण्यात आला आणि Financial Progress यामध्ये गावाच्या आर्थिक प्रगतीची माहिती दिली आहे.

त्यानंतर receipt या पर्यायासमोर गावासाठी किती निधी आला आणि expenditure मध्ये किती निधी कोणत्या कामासाठी खर्च झाला याची तपशीलवार माहिती असते. काही वेळा सरकारने दिलेला निधी खर्च झाला नाही तर हा निधी पुन्हा सरकारकडे परत जातो. पण, असा निधी परत जाणे म्हणजे सरपंच अकार्यक्षम असल्याचे लक्षण मानले जाते.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.