राऊतांचं अज्ञान, मी कधीही मातोश्रीवर फोन केला नाही: नारायण राणे

राणे दोन महिन्यांपूर्वी मातोश्रीवर दिवसातून तीन तीन वेळा फोन करत होते. | Narayan Rane

राऊतांचं अज्ञान, मी कधीही मातोश्रीवर फोन केला नाही: नारायण राणे
नारायण राणे, भाजप नेते

सिंधुदुर्ग: वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी मिळावी यासाठी राणे काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर सातत्याने फोन करत होते, हा शिवसेनेचा खळबळजनक दावा नारायण राणे (Narayan Rane) यांनी फेटाळून लावला आहे. मी कधीही मातोश्रीवर फोन केला नाही, असा खुलासा त्यांनी केला. (BJP leader Naryan Rane hits back over Shivsena’s allegations)

नारायण राणे यांनी सोमवारी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. मी माझ्या हिंमतीवर वैद्यकीय महाविद्यालय उभारले आहे. विनायक राऊत माझ्यावर आकसापोटी टीका करतात. मुळात वैद्यकीय महाविद्यालयासाठी राज्य सरकार नव्हे तर केंद्रातून परवानगी मिळते. त्यामुळे विनायक राऊत (Vinayak Raut) यांचे वक्तव्य म्हणजे त्यांचे अज्ञान दाखवणारे आहे, अशी टीकाही नारायण राणे यांनी केली.

काय म्हणाले होते विनायक राऊत?

नारायण राणेंच्या मेडिकल कॉलेजला फडणवीस यांनी अखेरपर्यंत परवानगी दिली नाही म्हणून राणे दोन महिन्यांपूर्वी मातोश्रीवर दिवसातून तीन तीन वेळा फोन करत होते. अखेर उद्धव ठाकरेंनी कोकणात मेडिकल कॉलेज होत असल्यामुळे परवानगी दिली. उद्धव ठाकरेंना काही कळत नाही असा आरोप करता. नको कळू दे, पण टीका करताना शान राखून टीका करा, असा सल्लाही विनायक राऊत यांनी राणेंना दिला होता.

‘देवेंद्र फडणवीस नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते’

आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात देवेंद्र फडणवीस हे नितेश राणे यांना तुरुंगात टाकणार होते. त्यांनी एका व्यक्तीला 12 कोटीचा गंडा घातला होता. पण नारायण राणे भाजपला शरण गेले. त्यामुळे ती केस थांबली. आम्ही मनात आणलं तर ती केस एका दिवसात ओपन होऊ शकते. ती एक ओपन झाली तर दुसऱ्याच महिन्यात नितेश राणे तुरुंगात गेल्याशिवाय राहणार नाहीत, असा दावा विनायक राऊत यांनी केला होता.

संबंधित बातम्या:

दादागिरी केली तर ‘मातोश्री’च्या आतलं-बाहेरचं सगळं बाहेर काढेन : नारायण राणे

जिवाचं काही बरं वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार – नारायण राणे

राणेंची सुरक्षा काढली, मग वैभव नाईकांना सुरक्षा कशी, कोकणात जाऊन शेलारांचा ठाकरेंना सवाल

(BJP leader Naryan Rane hits back over Shivsena’s allegations)

Published On - 12:53 pm, Mon, 11 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI