राणेंची सुरक्षा काढली, मग वैभव नाईकांना सुरक्षा कशी, कोकणात जाऊन शेलारांचा ठाकरेंना सवाल

माजी मुख्यमंत्र्यांची तसेच कोकणाचं नेतृत्व करणारे नारायण राणे यांना दिलेली सुरक्षा व्यवस्था काढून घेतली गेली. हे चुकीचं आहे, असे म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीका केली. (ashish shelar Narayan Rane)

राणेंची सुरक्षा काढली, मग वैभव नाईकांना सुरक्षा कशी, कोकणात जाऊन शेलारांचा ठाकरेंना सवाल
ashish shelar


मुंबई : राज्य सरकारने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच इतर भाजप नेत्यांच्या सुरक्षेत कपात केल्यानंतर आता सरकरावर टीका होत आहे.  माजी मुख्यमंत्र्यांची तसेच कोकणाचं नेतृत्व करणारे नारायण राणे (Narayan Rane) यांना दिलेली सुरक्षा व्यवस्था काढून घेतली. हे चुकीचं आहे, असे भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी म्हटलंय. तसेच, नारायण राणेंची सुरक्षा काढली, पण असं काय घडलं की शिवसेना आमदार वैभव नाईक यांना सुरक्षा पुरवावी लागली असा सवालही शेलार यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे. ते सिंधुदुर्गमधील सावंतवाडीत बोलत होते. (bjp leader ashish shelar criticises state government on removal of security provided to Narayan Rane)

असं काय घडलं की वैभव नाईक यांना सुरक्षा दिली?

राज्य सरकारने रविवारी (10 जानेवारी) भाजप तसेच इतर पक्षाच्या नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली. यामध्ये भाजप नेते नारायण राणेंना पुरवलेली सुरक्षा व्यवस्था काढून घेतली गेली. यावर बोलताना “नारायण राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी राज्याचं आणि कोकणाचं नेतृत्व केलंय. त्यांना पुरवलेली सुरक्षा काढून घेतली आहे. दुसरीकडे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना सुरक्षा देण्यात आली आहे. हा माजी मुख्यमंत्र्यांसोबत केलेला दुर्व्यवहार आहे. यापूर्वी राज्यात असं कधीही घडलं नाही,” असं शेलार म्हणाले. तसेच, असं काय घडलं की वैभव नाईक यांना सुरक्षा पुरवावी लागली, असा प्रश्न शेलार यांनी राज्य सरकारला विचारला.

प्रचारासाठी आलो नाही

राज्यात ग्रामपंचायत निवडणुका सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गमध्ये येण्याचे कारण विचारले असता, प्रचारासाठी आलो नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, या निवडणुकीत भाजप स्थानिक पातळीवर सक्रिय आहे. वरून काही प्रचार, प्रसार किंवा व्यापक स्वरूपात योजना तयार केली नाही. केवळ या निवडणुकीत कार्यकर्त्यांचं मनोबल टिकून राहावं म्हणून प्रवास करत असल्याचे शेलार यांनी सांगितलं.

दरम्यान, सुरक्षा व्यवस्था काढून घेतल्यांनतर राणे यांनी सरकारवर टीका केलीये. त्यांनी जीवाचं काही बरंवाईट झालं तर याला सरकार जबाबदार असेल असं सांगितलं आहे. “राज्य सरकारने माझी सुरक्षा कालच काढली. मला केंद्र सरकारची सुरक्षा आहे. अतिरेक्यांपासून माझ्या जीवाला धोका असल्यामुळे मुंबई पोलिसांनी सुरक्षा दिली होती. पण राज्य सरकारने माझ्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली आहे. त्यामुळे जर माझ्या जिवाला धोका निर्माण झाला तर त्याला राज सरकार जबाबदार असेल”, असं नारायण राणे यांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या :

Shambhuraj Desai | समितीच्या शिफारशीनंतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत निर्णय : शंभुराज देसाई

फडणवीस, राज ठाकरेंच्या सुरक्षेत कपात; जाणून घ्या Z+, Y सुरक्षा व्यवस्था काय असते? कुणाला दिली जाते?

जिवाचं काही बरं वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार – नारायण राणे

(bjp leader ashish shelar criticises state government on removal of security provided to Narayan Rane)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI