AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ये पब्लिक सब जाणती है’, राज ठाकरेंची सुरक्षा कमी करणं हा सरकारचा खुजेपणा : बाळा नांदगावकर

'ये पब्लिक सब जाणती है' म्हणत नांदगावकरांनी राज ठाकरे यांची झेड सिक्युरिटी काढल्याचा सरकारचा निर्णय खुजेपणाचा असल्याची टीका केली.

'ये पब्लिक सब जाणती है', राज ठाकरेंची सुरक्षा कमी करणं हा सरकारचा खुजेपणा : बाळा नांदगावकर
| Updated on: Jan 11, 2021 | 1:31 AM
Share

मुंबई : ठाकरे सरकारने राजकीय नेत्यांना दिलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत अनेक नेत्यांची सुरक्षा यंत्रणा कमी केलीय. यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचाही समावेश आहे. त्यामुळेच मनसेचे नेते बाळा नांदगावकरांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. ‘ये पब्लिक सब जाणती है’ म्हणत नांदगावकरांनी राज ठाकरे यांची झेड सिक्युरिटी काढल्याचा सरकारचा निर्णय खुजेपणाचा असल्याची टीका केली (Bala Nandgaonkar criticize Thackeray Government over reduction in security of Raj Thackeray).

बाळा नांदगावकर यांनी याबाबत सविस्तर फेसबुक पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे, “सरकारने विरोधी पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली. त्यात राजसाहेब यांचेही नाव आले. सरकार कोणाचेही असो वास्तवाचे भान ठेऊन असे निर्णय घ्यायला हवे. राज्यातील जनतेसाठी सतत उपलब्ध असणारा नेता, स्वतःच्या पक्षाचा फायदा नुकसान याचा विचार न करता स्पष्ट भूमिका घेणारा नेता, सामान्य लोकांच्या भल्यासाठी अनेकांशी भिडणारा नेता म्हणून राजसाहेब पूर्ण राज्याला माहिती आहेत.”

“राज ठाकरे यांच्या रोखठोक स्वभावामुळे अनेक हितशत्रू त्यांच्याबद्दल वैर बाळगून आहेत, परंतु त्यांनी कधी अशा हितशत्रूंची तमा बाळगली नाही. त्यांच्या एका आवाजावर अनेक सामान्य लोकांना संरक्षण देणारे हजारो महाराष्ट्र सैनिक या राज्यात आहेत. सरकार दरबारी जी कामे होत नाही किंवा ज्या विषयांना मतपेटीसाठी टाळले जाते असे अनेक विषय राज दरबारी निकालात निघतात. त्यांच्या जीवाला आपल्या देशातील विघ्नसंतोषी लोकांपासून तर पाकिस्तानी दहशतवाद्यांपर्यंत धोका असल्याचे आपण जाणूनच आहोत. तरी त्यांची सुरक्षा वाढविण्याऐवजी कमी करण्याचा घेतलेला निर्णय हा सरकारचे “खुजेपण” ठळकपणे दाखविणारा आहे,” असंही नांदगावकरांनी नमूद केलं.

‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’

बाळा नांदगावकर म्हणाले, “चीड या गोष्टीची येते की यात ज्यांना नव्याने सुरक्षा देण्याचा अथवा ज्यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे ती नावं बघितल्यास एकच प्रश्न उपस्थित होतो ते म्हणजे सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? सरकारने ज्या नवीन लोकांना सुरक्षा देण्याचे तसेच सुरक्षा वाढविण्याचे ठरविले त्यापेक्षा तोच पैसा आरोग्य व्यवस्था विकासासाठी वापरला असता तर अतिशय चीड आणणारी भंडारा जिल्ह्यातील 10 बाळांचा जीव घेणारी घटना टाळता आली असती.”

शेवटी पुन्हा त्यांनी सरकारने जनतेला गृहीत धरू नये, ये पब्लिक है ये सब जानती है, असं म्हणत सरकारला इशारा दिला.

हेही वाचा :

‘जिथे भेळ, तिथे खेळ’; गीते, बागुलांच्या शिवसेना प्रवेशावर मनसेचा टोला

पोलीस, डॉक्टरांसह लष्करी जवान आणि माजी सैनिकांनाही प्राधान्याने कोरोनाची लस द्या, मनसेची मागणी

‘सुडाचे राजकारण असले तरी प्रताप सरनाईकांनी ईडीच्या चौकशीला सामोरे जावे’

Bala Nandgaonkar criticize Thackeray Government over reduction in security of Raj Thackeray

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.