‘सुडाचे राजकारण असले तरी प्रताप सरनाईकांनी ईडीच्या चौकशीला सामोरे जावे’

ईडीची नोटीस राज ठाकरें, शरद पवारांना सुद्धा आली होती. ते सामोरे गेले आता शिवसेना नेत्यानीही सामोरे जावं असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:02 PM, 24 Nov 2020

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर आज सकाळी ईडीने धाड टाकल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावर विरोधकांनी शिवसेनेला टार्गेट केलं आहे. या प्रकरणात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही भाष्य केलं आहे. ईडीची नोटीस राज ठाकरे आणि शरद पवार यांनासुद्धा आली होती. ते दोघेही या नोटीसाला सामोरे गेले होते. त्यामुळे आता शिवसेना नेत्यानीही सामोरे जावं असा सल्ला बाळा नांदगावकर यांनी दिला आहे. (ED notice came to Raj Thackeray sharad Pawar too Bala Nandgaonkar reaction to Sarnaik notice case)

इतकंच नाही तर सुडाचे राजकारण जरी असले तरी चौकशीला सामोरं जावं असंही बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. सांगलीत पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, आज ईडीच्या धाडीनंतर सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर तब्बल पाच तास प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली असून त्यानंतर त्यांना सोडण्यात आलं आहे. ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर विहंग यांनी थेट घर गाठले. त्यांनी मीडियाला कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

ईडीने आज पहाटे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर, कार्यालय आणि दहा ठिकाणांवर हे छापे मारले होते. सरनाईक यांचे चिरंजीव विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावरही छापे मारण्यात आले. यावेळी ईडीने सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयातील कागदपत्रे, मोबाईल आणि लॅपटॉप ताब्यात घेतले. तब्बल चार तासांच्या धाडसत्रानंतर ईडीने दुपारी 3 वाजता विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतलं होतं.

त्यानंतर विहंग यांना ईडी कार्यालयात आणून त्यांची तब्बल पाच तास चौकशी केली. यावेळी त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगसह त्यांचे व्यवसाय आणि उत्पन्नाचे स्त्रोत या अनुषंगाने प्रश्नांचा भडिमार केल्याचं सूत्रांनी सांगितलं. पाच तासांच्या प्रश्नांच्या सरबत्तीनंतर विहंग यांना सोडून देण्यात आलं. ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यावर विहंग यांनी मीडियाला कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी थेट घर गाठले. त्यामुळे ईडीने त्यांना काय प्रश्न विचारले हे गुलदस्त्यात आहे.  (ED notice came to Raj Thackeray sharad Pawar too Bala Nandgaonkar reaction to Sarnaik notice case)

दरम्यान, ईडीने ठाण्यातील हिरानंदानी येथील प्रताप सरनाईक यांच्या 23व्या मजल्यावरील घरावर, वर्तकनगरमधील कार्यालयावर आणि घोडबंदर रोडवरील विहंगम हॉटेलवर आज सकाळी धाड मारली. त्याच बरोबर सरनाईक यांच्या विहंग आणि पूर्वेश या दोन्ही चिरंजीवांच्या कार्यालय आणि घरावरही धाड मारली. ईडीने सरनाईक यांच्या एकूण दहा ठिकाणांवर धाड मारली आहे. ही धाड मारण्यापूर्वी ईडीने पूर्ण तयारी केली होती. ईडीने पोलिसांसह स्थानिक प्रशासनालाही या धाडीचा सुगावा लागू दिला नाही.

इतर बातम्या –

Vihang Sarnaik | विहंग सरनाईक यांची 3 तासांपासून चौकशी सुरु

Exclusive : ईडीची कारवाई कशासाठी मलाच माहीत नाही; कायदेशीर लढाई लढण्याचे सरनाईक यांचे सुतोवाच

(ED notice came to Raj Thackeray sharad Pawar too Bala Nandgaonkar reaction to Sarnaik notice case)