बाळासाहेब ठाकरे हे माझे गुरु, त्यांनीच मला घडवलं : नारायण राणे

बालहट्ट पुरवण्यापेक्षा मुंबईतील कायदा सुव्यवस्था आणि मुंबईकरांच्या सुरक्षितता विचारात घेणे गरजेच असल्याची टीका (Narayan rane criticizes uddhav Thackeray) राणेंनी केली."

Narayan rane criticizes uddhav Thackeray, बाळासाहेब ठाकरे हे माझे गुरु, त्यांनीच मला घडवलं : नारायण राणे

पुणे : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या 40 वर्षात कधीही राज्याचा मुख्यमंत्री होण्यासाठी काम केलं नाही. त्यामुळे ते मुख्यमंत्री होतील असं कधीच वाटलं नव्हतं. ते अनुभव शून्य असून लोकांचे प्रश्न सोडवण्याचा त्यांना अनुभव नाही. त्यामुळे त्यांचे नुकसान होईल की नाही हे माहीत नाही. पण राज्यातील जनतेचं नक्की नुकसान होणार,” अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी केली. “उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात राज्याचा मुख्यमंत्री यांचा मान-सन्मान ठेवावा म्हणून त्या पदाचा मान ठेवतो. मात्र व्यक्ती म्हणून ते अनुभव शून्य असून राज्य अधोगतीकडे जाईल,” असं ही राणेंनी यावेळी (Narayan rane criticizes uddhav Thackeray) म्हटलं.

पुणे ते सॅटर्डे क्लब या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, श्रीनिवास पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेते आणि पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना राणे म्हणाले की, “माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात अत्यंत चोखपणे काम केलं. त्यांनी आपल्या कार्यकाळात कोणत्या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळले नाही. सर्व प्रश्न यशस्वी सोडवले. त्याचबरोबर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच माझे गुरू असून त्यांनीच मला घडवल्याचे राणेंनी म्हटलं.”

तर मुंबईतील नाईट लाईफवर बोलताना “नाईटलाइफची मागणी कोणीच केली नव्हती. नाईटलाइफ मागणी बाल हट्ट आहे. बालहट्ट पुरवण्यापेक्षा मुंबईतील कायदा सुव्यवस्था आणि मुंबईकरांच्या सुरक्षितता विचारात घेणे गरजेच असल्याची टीका (Narayan rane criticizes uddhav Thackeray) राणेंनी केली.”

चंद्रकांत पाटलांनी काहीतरी करण्यासाठी पालकमंत्री हे पद महत्त्वाचा आहे. मात्र निवांत जगण्यासाठी सध्याचे पद ठीक असल्याचं सांगितलं. तर खासदार श्रीनिवास पाटील यांनी सरकारी सेवेत असताना माझ्या राजीनामा अर्ज नारायण राणे यांनी सही केली. त्यामुळे मी सही स्थितीत असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर राजकारण आणि मैत्री या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. मी कधीही राजकारणात दोस्ती आणि दोस्तीत राजकारण आणत नसल्याचे राणेंनी म्हटलं.

यावेळी चंद्रकांत पाटलांनी आपल्या पूर्वीच्या काही गोष्टी सांगताना टिमक्याची चोळी हे कोळीगीत म्हटलं. तर श्रीनिवास पाटील यांनी आपल्या खड्या आवाजात जोरदार लावणी गायली. तर वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी बँकेवर वात्रटीका करून नेहमीच्या शैलीत दाद (Narayan rane criticizes uddhav Thackeray) मिळवली.
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *