जीव देईन, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही, नितीन गडकरींनी थेटच सांगितलं
माझ्या आयुष्यात मी लोकमान्य टिळकांचे स्वप्न पूर्ण करण्याकरता जेवढे काही करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करीन असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सत्काराला उत्तर देताना म्हणाले.

काही पुरस्कार व्यक्तींची प्रतिष्ठा वाढवतात तसाच माझी प्रतिष्ठा वाढवणारा हा पुरस्कार असल्याने आपल्याला अतिशय आनंद झाला असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते सोहळ्याला उत्तर देताना बोलत होते. ते पुढे म्हणाले की लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, त्यांचा पुरस्कार मिळाल्याने माझं व्यक्तीव वाढलं आहे, फुटपाथवर चाराण्याचा चहा पिता-पिता माझे अर्धे आयुष्य गेलेले आहे. लोकमान्य टिळकांचा सारख्या अनेक राष्ट्रपुरुषांच्या बलिदानामुळं आपण आजचं जीवन जगत आहे असेही गडकरी यावेळी म्हणाले.
पुणे येथे एका सोहळ्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की,’ माझ्याकडे स्ट्राँग पॉलिटीकल व्हील आहे. मला निर्णय घेणारे अधिकारी आवडतात, मी नेहमी म्हणतो, माझ्या खात्याकडे पैशाची कमी नाही, माझ्याकडे एवढे पैसे पडले आहेत, तुम्ही काळजीच करू नका, कामाची कमी आहे. धडाडीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची कमी आहे.’
तर दहा वेळा कायदा तोडा…
महात्मा गांधींनी सांगितलं होतं की जर सर्वसामान्य माणसाच्या हिताचे काम असेल तर एकदा नाही तर दहा वेळा कायदा तोडा.महाराष्ट्राने सर्वात जास्त जीएसटी रेव्यून्यू रूपात दिलेला आहे.मला विश्वास आहे, पंतप्रधान मोदी यांचं आत्मनिर्भर भारताचं स्वप्नं पुढच्या पाच वर्षात पूर्ण होईल. स्वराज्याचं सुराज्य झाल पाहिजे, मी श्रीकांतला म्हटलं की मी जीव देईन पण काँग्रेसमध्ये येणारं नाहीं.. मी नीतिमत्ता नाही सोडणार. लढले पाहिजे, लढणं हा महाराष्ट्रचा स्वभाव आणि विचार आहे असेही ते यावेळी म्हणाले.
देशाची विश्वगुरू बनण्याची क्षमता
मला खरोखर या पुरस्कारला पात्र नाही, पण माझ्यावर फार मोठी जबाबदारी या ट्रस्टींनी टाकली आहे. योग्य असेल तर कोणाचाही काम झालं पाहिजे आणि योग्य नसेल तर मी त्याला तोंडावर सांगतो हे काम योग्य नाही हे होणार नाही.आपला देश खूप ताकदवानं आहे, विश्वगुरू बनण्याची क्षमता आहे.आत्मविश्वास आणि अहंकार या दोन शब्दात थोडसं अंतर असते. जे जे मला करता येईल, ते ते करण्याचा मी प्रयत्न करेल असा संकल्प करत आहे असेही नितीन गडकरी यावेळी म्हणाले.
काही दिवसापूर्वी लेख लिहून आला होता नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काळात पुण्याकडे दुर्लक्ष झाले. पुण्याच्या आसपास मी दोन लाख कोटींची काम करीत आहे. माझ्या मनात पुणे, मुंबई असा कोणताही भाव नाही असेही नितीन गडकरी यावेळी म्हणाले.
