Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pooja Khedkar : मोठी बातमी! पूजा खेडकर यांची आई फरार?, फोनही बंद; पोलिसांची पथके मागावर

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीतील वाढ काही कमी होताना दिसत नाहीये. पूजा यांच्या वादग्रस्त प्रकरणानंतर आता त्यांच्या घरातील इतर सदस्यांवरही विविध आरोप होत आहे. पूजा यांची आई मनोरमा खेडकर यांनी एका शेतकऱ्याला पिस्तुल दाखवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Pooja Khedkar : मोठी बातमी! पूजा खेडकर यांची आई फरार?, फोनही बंद; पोलिसांची पथके मागावर
Follow us
| Updated on: Jul 15, 2024 | 12:28 PM

पूजा खेडकर प्रकरणात रोज नवी माहिती समोर येत आहे. पूजा खेडकर प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच त्यांची आई मनोरमा खेडकर यांचा हातात पिस्तुल घेतलेला एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मनोरमा खेडकर यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनोरमा खेडकर या फरार झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. पोलिसांचं एक पथक मनोरमा यांचा शोध घेत आहे. मनोरमा यांचा फोनही बंद असल्याने त्यांचा शोध घेण्यात अडचणी येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

हातात पिस्तुल घेऊन शेतकऱ्याला धमकावल्या प्रकरणी पोलिसांना मनोरमा खेडकर यांची चौकशी करायची आहे. मात्र, त्या सापडत नाहीत. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांची पथके शोधण्यासाठी वेगवेगळ्या भागात रवाना झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह गुन्हे शाखेची पथके खेडकर यांचा शोध घेत आहेत. शेतकऱ्याला पिस्तुल दाखवून दमदाटी केल्याप्रकरणी मनोरमा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी घराला कुलूप असल्याने फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा फोनही लागत नसल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. तसेच खेडकर कुटुंबाच्या पुणे आणि आजूबाजूला असणाऱ्या फार्म हाऊसवर देखील पुणे पोलिसांनी घेतला शोध आहे.

फोन बंद, गेल्या कुठे?

हे सुद्धा वाचा

मनोरमा खेडकर यांचा फोन बंद येत आहे. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत. त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नाहीये. त्यामुळेच त्यांचा शोध घेण्यासाठी पथके काम करत आहेत, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली.

भीक मांगो आंदोलन

दरम्यान, मनोरमा खेडकर यांच्या विरोधात आज पुण्यात आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्याला पिस्तुल दाखवून धमकावल्याप्रकरणी मनोरमा यांच्यावर कारवाई करा, अशी मगाणी यावेळी आंदोलकांनी केली. यावेळी पुणेकरांनी भीक मांगो आंदोलन केलं. या आंदोलनात पुणेकर मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

वाशिममध्ये विरोध

दरम्यान, प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा आता वाशिममध्ये देखील विरोध करण्यात आला आहे. वाशिम म्हणजे काय कचऱ्याची पेटी आहे का? या आशयाचे पत्र राज्याचे मुख्यसचिवांना स्थानिक वकील संदीप ताटके यांनी लिहिलं आहे. हे पत्र मेल करण्यात आलं आहे. पूजा खेडकर यांची वाशीममधून बदली करावी अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. राज्य सरकारने आमची मागणी ऐकली नाही तर आंदोलनासोबतच या विरोधात रिट याचिका दाखल करणार असल्याचे संदीप ताटके यांनी म्हटले आहे.

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.