तुकाराम मुंढेंना सॅल्यूट कसा मारायचा? सीनियरकडून ज्युनिअरला प्रशिक्षण, वेळेआधीच मुंढे कार्यालयात

आयुक्त तुकाराम मुंढे यांचा दरारा मनपा कर्मचाऱ्यांमध्ये आहेच, मात्र सुरक्षा रक्षकांमध्येही दरारा पाहायला मिळाला. कारण आयुक्त तुकाराम मुंढे यांना सॅल्यूट कसा करायचा, याबाबतचं प्रशिक्षण मनपाचे सुरक्षा कर्मचारी घेत होते.

तुकाराम मुंढेंना सॅल्यूट कसा मारायचा? सीनियरकडून ज्युनिअरला प्रशिक्षण, वेळेआधीच मुंढे कार्यालयात

नागपूर : कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे (IAS Tukaram Mundhe Nagpur Commissioner) यांनी नागपूर महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर, थेट कामकाजाला सुरुवात केली आहे. तुकाराम मुंढे काल साडेनऊच्या ठोक्याला कार्यालयात दाखल झाल्यानंतर कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. त्यानंतर आज आयुक्त मुंढे 9.40 वा कार्यालयात आले. (IAS Tukaram Mundhe Nagpur Commissioner)

आयुक्त तुकाराम मुंढे यांचा दरारा मनपा कर्मचाऱ्यांमध्ये आहेच, मात्र सुरक्षा रक्षकांमध्येही दरारा पाहायला मिळाला. कारण आयुक्त तुकाराम मुंढे यांना सॅल्यूट कसा करायचा, याबाबतचं प्रशिक्षण मनपाचे सुरक्षा कर्मचारी घेत होते.

नवीन भरती झालेल्या सुरक्षा रक्षकांना जुन्या सहकाऱ्यांनी मुंढे यांना सॅल्यूट कसा करायचा याचं प्रशिक्षण दिलं. आयुक्त आल्यानंतर प्रथम काय करायचं, कसं उभं राहायचं, सॅल्युट कसा करायचा, याबाबतचं प्रशिक्षण जुन्या सहकाऱ्याने नव्या सहकाऱ्याला दिला.

तुकाराम मुंढे यांचा आजचा दुसरा दिवस आहे.  दुसऱ्या दिवशीही दिवसभर बैठकांचं सत्र चालू आहे. तुकाराम मुंढे आज दिवसभरात सहा बैठका, सात विविध कामांचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर आज संध्याकाळी 4 ते 5 दरम्यान नागपुरात तुकाराम मुंढे यांचा पहिला जनता दरबार असेल.

पहिल्या दिवसाचं कामकाज

कडक शिस्तीचे आणि कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी काल नागपूर महापालिकेचे आयुक्त (IAS Tukaram Mundhe Nagpur Commissioner) म्हणून कार्यभार स्वीकारला. सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी महापालिकेच्या मुख्यालयात दाखल होत, तुकाराम मुंढेंनी महापालिकेचा (IAS Tukaram Mundhe Nagpur Commissioner) कार्यभार हाती घेतला. पहिल्याच दिवशी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठक घेतली. महत्त्वाचं म्हणजे तुकाराम मुंढे हे आयुक्तपदी येणार असल्याच्या बातमीनंतरच, नागपूर मनपाचे कर्मचारी वेळेत येण्यास सुरु झाले. मात्र कालचा योगायोग म्हणजे कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी वापरात येणाऱ्या पंचिंग मशीनमध्ये बिघाड झाल्याने, कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.

संबंधित बातम्या  

साडेनऊच्या ठोक्याला तुकाराम मुंढे कार्यालयात, हजेरीचं पंचिंग मशीन बिघडलं, केबिनबाहेर जुन्या आयुक्तांची पाटी बदलताना धावपळ

Published On - 12:03 pm, Wed, 29 January 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI