AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेसीबीला लटकवलं, फरपटत नेलं आणि … मुरूम माफियांचा तहसीलदारावर जीवघेणा हल्ला !

नागपूरमधील कुही तालुक्यात अवैध मुरुम उत्खननावर कारवाई करताना नायब तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला झाला. मुरुम माफियांनी त्यांना जेसीबीला बांधून ३-४ किमी फरफटत नेले आणि ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

जेसीबीला लटकवलं, फरपटत नेलं आणि ... मुरूम माफियांचा तहसीलदारावर जीवघेणा हल्ला !
नागपूरचया घटनेने हादरले नागरिक
| Updated on: May 07, 2026 | 11:36 AM
Share

रोज उठून कोणत्या ना कोणत्या गुन्ह्याच्या बातम्या कानावर येतच असतात. कधी खून, दरोडा, कधी भोंदूबाबाचे कारनामे, कधी महिला मुलींवर अत्याचार. राज्यात कायदा-सुव्यवस्था नावाचा काही प्रकार अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न पडावा, अशाच घटना सतत कानावर येत असता. गुन्हेगारांना कायद्याची, पोलिसांची भीतीच उरली नाहीये, असं वाटणारी आणखी एक धक्कादायक आणि लोकांना हादरवणारी घटना नागपूरमध्ये घडली आहे.

नागपूरच्या कुही तालुक्यात नायब तहसीलदारांना डायरेक्ट जेसीबीवर लटकवून फरपटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुही तालुक्यातील बोरी नाईक परिसरात मुरूम माफियांनी महसूल पथकावर हल्ला चढवला. त्याला डायरेक्च जेसीबीला लटकावलं आणि 3 ते 4 किलोमीटर फरपटत नेलं. एवढंच नव्हे कर तर त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जीव मारण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता.

ट्रॅक्टर चालवून जीव घेण्याचा प्रयत्न 

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी, 5 मे रोजी रात्री 11.30 च्या सुमारास मुरूम माफियांनी हा हल्ला केला. त्यांनी नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांना चालत्या जेसीबीला लटकवून तब्बल 3 ते 4 किलोमीटरपर्यंत फरटपट नेलं. त्यांचा क्रूकर कृत्य एवढ्यावरचं थांबलं नाही, तर त्यांनी निकाळजे यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून ठार मारण्याचाही प्रयत्न केला.

बोरी नाईक परिसरात सुरू असलेल्या अवैध मुरूम उत्खननाची माहिती मिळताच नायब तहसीलदार निकाळजे यांनी धाड टाकली होती. तेव्हाच माफियांनीा हा हलल्ला करत त्यांन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेची माहिती मिळताच पोलीसाचं पथक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी कुही पोलिसांनी जेसीबी चालक मयूर थोटे याला बेड्या ठोकत त्याला बुधवारी अटक केली

रोहित पवारांचा संताप

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, आमदार रोहित पवार यांनीही या घटनेवरून संताप व्यक्त केला आहे. राज्यात ना चिमुकल्या मुली सुरक्षित आहे… ना महिला सुरक्षित आहेत… ना प्रशासन सुरक्षित आहे.. सुरक्षित आहे फक्त सरकार… तेही जोपर्यंत जनतेच्या संतापाचा उद्रेक होत नाही तोपर्यंत..! असं रोहित पवारांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहीलं आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...