AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

21 तोळे सोनं, 25 लाख रुपये, तरी सासरच्यांची भूक संपेना; नाशिकमध्ये सुखी संसाराचा भयानक अंत

नाशिकमध्ये हुंड्यासाठी आणि पैशांच्या हव्यासापोटी एका ४० वर्षीय महिलेने आपली जीवनयात्रा संपवली आहे. माहेरून २५ लाख रुपये देऊनही सासरच्यांनी छळ सुरूच ठेवल्याने आशा घोटेकर यांनी आत्महत्या केली.

21 तोळे सोनं, 25 लाख रुपये, तरी सासरच्यांची भूक संपेना; नाशिकमध्ये सुखी संसाराचा भयानक अंत
nashik
| Updated on: May 07, 2026 | 11:41 AM
Share

राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्यातच आता नाशिकच्या जेलरोड परिसरातील दसकगाव येथे एका ४० वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आशा प्रवीण घोटेकर असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी पतीसह ६ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीसह २ जणांना अटक केली असून सध्या याचा पुढील तपास सुरू आहे.

१५ वर्षांच्या संसारानंतर दुर्दैवी अंत

संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला येथील रहिवासी गणेश गोपाळराव वाळके यांची बहीण आशा हिचा विवाह २००८ मध्ये दसकगाव येथील प्रवीण साहेबराव घोटेकर याच्याशी झाला होता. लग्नानंतरची पहिली काही वर्षे सुखात गेली. मात्र २०१८ पासून आशा घोटेकर यांना सासरच्या लोकांनी छळायला सुरुवात केली. त्यांचे पती, सासू, सासरे आणि दीर हे त्यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी करायचे. ही मागणी करून त्यांनी आशा यांना मानसिक आणि शारीरिक कोंडीत पकडले होते.

त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०१८ मध्ये फ्लॅट आणि चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी माहेरुन २५ लाख रुपये आण, असा तगादा सासरच्यांनी लावला होता. बहिणीचा संसार सुखाचा व्हावा या भावनेतून गणेश वाळके यांनी आपल्या आईच्या नावावर असलेली जमीन विकून ही रक्कम सासरच्यांना दिली होती. मात्र, एवढी मोठी रक्कम देऊनही सासरच्यांची हाव संपली नाही. त्यांनी आशा यांचे २१ तोळे सोन्याचे दागिनेही काढून घेतले होते.

आशा यांना तिचे पती प्रवीण घोटेकर याचे अन्य एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याबाबत त्यांनी जाब विचारला असता, त्यांना वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यात आला. इतकेच नव्हे तर सासरच्या मंडळींनी त्यांना घराबाहेर काढण्याची धमकी दिली होती. जादूटोणा करून तुला मारून टाकू, अशी भीतीही त्यांना घातली, असा खळबळजनक आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

बुधवारी सकाळी घटना उघडकीस

बुधवारी (६ मे) सकाळी ७ च्या सुमारास आशा यांनी आपल्या खोलीचा दरवाजा उघडला नाही. सासरच्यांनी ही माहिती त्यांच्या माहेरच्यांना दिली. आशा यांच्या नातेवाईकांनी नाशिकला धाव घेतली. मात्र त्यापूर्वीच त्यांना बिटको रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले होते. आपल्या बहिणीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप गणेश वाळके यांनी केला आहे.

गणेश वाळके यांच्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलिसांनी पती प्रवीण साहेबराव घोटेकर, साहेबराव सावळीराम घोटेकर (सासरे), लताबाई साहेबराव घोटेकर (सासू), राजेंद्र साहेबराव घोटेकर (दीर), चित्रा राजेंद्र घोटेकर (जाऊ) आणि आरती नयन गोसावी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. यापैकी पतीसह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Follow Us
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.