AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Rain Update : राज्यावर मोठं संकट, पुढील 72 तास अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाचा धडकी भरवणारा इशारा

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे, नद्या, नाल्यांना पूर आला. दरम्यान राज्यात पुढील चार दिवसांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

IMD Rain Update : राज्यावर मोठं संकट, पुढील 72 तास अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाचा धडकी भरवणारा इशारा
IMD Maharashtra Rainfall ForecastImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 01, 2026 | 8:31 PM
Share

20 जुन पर्यंतचा कालावधी राज्यात कोरडाच गेला होता. या काळात पाऊस न पडल्याने चिंता वाढली होती. परंतु 20 जूननंतर महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याचं चित्र आहे. 20 जून पासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील चार दिवसांमध्ये आता राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.  राज्यात पाऊस धुमाकुळ घालणार आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  भारतीय हवामान विभागाकडून राज्यतील काही भागांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे, तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून काही जिल्ह्यांमध्ये थेट रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार दोन जूनला पालघर जिल्ह्यात मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे, तर तीन आणि चार जून रोजी पावसाचा जोर आणखी वाढणार असून, या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे ठाणे जिल्ह्याला देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, पुढील चार दिवस जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईमध्ये देखील आता पावसाचा जोर आणखी वाढणार असून, दोन ते पाच जूनदरम्यान अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगडला दोन जून रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, तीन जून रोजी जिल्ह्यात पाऊस धुमाकुळ घालणार आहे. जिल्ह्याला पावसाचा थेट रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नये, असं देखील हवामान विभागाकडून आवाहन करण्यात आलं आहे.

दुसरीकडं विदर्भात देखील पुढील तीन ते चार दिवसांमध्ये पावासाचा जोर वाढणार आहे.  नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 48 ते 72 तासांत विदर्भात समाधानकारक पावसाची शक्यता हवामान विभाकडून वर्तवण्यात आली आहे.  आज नागपूर शहरातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. जून महिना उष्ण आणि तुलनेने कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात समाधानकारक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Follow Us
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा