Weather Forecast : पश्चिम किनारपट्टीवरुन वेगवान वारे, राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, IMD चा नवा ॲलर्ट

पुढील चार ते पाच दिवसांसाठी विविध जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आले आहेत. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

Weather Forecast : पश्चिम किनारपट्टीवरुन वेगवान वारे, राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, IMD चा नवा ॲलर्ट
आज मध्यरात्री गुलाब वादळ गोपाळपूर, कलिंगपट्टणममध्ये धडकण्याची शक्यता


मुंबई: भारतीय हवामान विभागानं येत्या तीन ते चार दिवसात महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर वेगानं वारे वाहतील. तसेच राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असा, अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आज तीव्र झाले आहे. येत्या 24 तासात ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.त सेच ते आतल्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम होऊन पश्चिम किनारपट्टीवर पुढचे तीन ते चार दिवस वेगवान वारे वाहतील, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तर, राज्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्यावतीनं हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. तर, पुढील चार ते पाच दिवसांसाठी विविध जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आले आहेत. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

राज्यातील आजची पावसाची स्थिती कशी?

हवामान विभागानं आजसाठी रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, कोल्हापूर, पालघरला ऑरेंज अ‌ॅलर्ट तर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, वाशिम, गोंदिया, गडचिरोली, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदियाला यलो अ‌ॅलर्ट दिला आहे.

13 सप्टेंबरला पावसाची स्थिती कशी?

हवामान विभागानं सोमवारसाठी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती, आणि गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट दिला आहे.

14 सप्टेंबरला पावसाची स्थिती कशी?

हवामान विभागानं मंगळवारी पालघर, ठाणे, रायगड,पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, परभणी, हिंगोली, नाशिक, नंदूरबार, जळगाव, धुळे, औरंगाबाद, जालना, बीड, आणि अमरावती यलो अ‌ॅलर्ट दिला आहे.

15 सप्टेंबरला पावसाची स्थिती कशी?

हवामान विभागानं पालघर जिल्ह्याला ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, सातारा, पुणे जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, गुरुवारी 16 सप्टेंबरला पालघर जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

इतर बातम्या:

VIDEO: शरद पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्रं यावं; बाळासाहेब थोरातांचं पहिल्यांदाच खुलं आवतन

Lord Ganesha | तुळशीने गणपतीला शाप का दिला होता, जाणून घ्या ही पौराणिक कथा…

नागपूरकरांचं टेन्शन वाढलं, 12 पोलिसांना कोरोना, पोलीस दलात खळबळ

हेही पाहा

IMD Predicted rainfall increased in Various parts of Maharashtra including Kokan and Western Maharashtra due to low pressure area in bay of Bengal

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI