AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Rain Alert : हवामान विभागाचा नवा अंदाज आला, कोकण, मराठवाडा, विदर्भ… कोणत्या भागात कसे हवामान?

Maharashtra Weather Forecast L : राज्यातील पावसाचा जोर थोडा कमी झाला आहे. मराठवाडा आणि विदर्भाकडे पावसाने पाठ फिरवली आहे. उद्या राज्याच्या कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे ते जाणून घेऊयात.

IMD Rain Alert : हवामान विभागाचा नवा अंदाज आला, कोकण, मराठवाडा, विदर्भ... कोणत्या भागात कसे हवामान?
Maharashtra light rain alertMaharashtra light rain alertImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 19, 2026 | 8:20 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर थोडा कमी झाला आहे. मराठवाडा आणि विदर्भाकडे पावसाने पाठ फिरवली आहे. 20 ऑगस्टसाठी हवामान विभागाने राज्याला काही खास इशारा दिला नसला तरी काही भागात पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे देशाच्या काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उद्यासाठी राज्याच्या आणि देशाच्या कोणत्या भागात पावसाच्या सरी कोसळणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील हवामान

हवामान विभागाने 20 ऑगस्ट रोजी राज्याच्या अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर आणि मुंबईत हलका पाऊस, तर ठाणे, रायगड आणि रत्नागिरीत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग मध्येही मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर अहिल्यानगरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील हवामान

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाटमाथा परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर परभणी, बीड आणि नांदेड जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो असं हवामान विभागाने म्हटलं आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही, मात्र काही भागात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशात अतिवृष्टीचा इशारा

भारतीय हवामान विभागाने उत्तर भारतापासून पूर्व आणि ईशान्य भारतातील अनेक भागात उद्या म्हणजेच 20 ऑगस्टला मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात 20 आणि 22 ऑगस्टला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पूर्व उत्तर प्रदेशात 21 ते 24 ऑगस्टदरम्यान जोरदार पाऊस होऊ शकतो. तर राजधानी दिल्ली आणि आसपासच्या भागात उद्या आकाश साधारणपणे ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच पूर्व आणि ईशान्य भारतातील अनेक भागात उद्या मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Follow Us
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
Video : पुण्यात मनसेचं गुटखा माफियाविरोधात तीव्र आंदोलन
Video : पुण्यात मनसेचं गुटखा माफियाविरोधात तीव्र आंदोलन, पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह
बाळासाहेबांनी खोटेपणाचं राजकारण केलं नाही, पण... राम कदमांची टीका
Video : बाळासाहेबांनी खोटेपणाचं राजकारण केलं नाही, त्यांच्यानंतर मात्र..., राम कदमांची ठाकरे बंधूंवर टीका
वाल्मिक कराड गॅंगच्या सुग्रीव कराडची उमरी टोल नाक्यावर गुंडगिरी? थेट..
वाल्मिक कराड गॅंगच्या सुग्रीव कराडची उमरी टोल नाक्यावर गुंडगिरी? थेट...
पाकिस्तानला धूळ चारत भारताचा दणदणीत विजय; आशियाई क्रीडा स्पर्धेत...
पाकिस्तानला धूळ चारत भारताचा दणदणीत विजय; आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक!