AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Rain Forecast : पुढील 48 तास धोक्याचे, महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना हाय अलर्ट

देशासह राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता असून, महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

IMD Rain Forecast : पुढील 48 तास धोक्याचे, महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना हाय अलर्ट
| Updated on: May 30, 2025 | 3:06 PM
Share

यंदा देशासह महाराष्ट्रात मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला आहे, सध्या अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाकडून आता पुन्हा एकदा पुढील तीन दिवस अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिमेकडून जोरदार वारे वाहणार असून, त्याचा परिणाम म्हणजे केरळमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 31 मे, 1 जून आणि 2 जून रोजी केरळसह, पश्चिम बंगाल, सिक्कीम या राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर पुढील दोन दिवस गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आणि महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होईल असा अंदाज आयएमडीनं वर्तवला आहे.

कुठे -कुठे पावसाचा इशारा?

हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील दोन दिवस महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, महाराष्ट्रामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रासोबतच आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपूरा, पश्चिम बंगाल, सिक्किम आणि ओडिशामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्रात पूरस्थिती नियंत्रणात

राज्यात सर्व जिल्ह्यात पावसाची नोंद झालेली आहे. जोरदार पावसामुळे काही ठिकाणी नद्यांना पूर देखील आला होता. मात्र सध्यास्थितीत पूर परिस्थिती नियंत्रणात असून कुठेही पूर आल्याची घटना घडलेली नाहीये. राज्य आपत्कालीन कार्य केंद्र सर्व जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्रांच्या सातत्याने संपर्कात आहे.पूर परिस्थिती बाबत उपाय योजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफ यांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.