
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, आज इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीला 24 पक्षांची उपस्थिती होती. या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होते. या बैठकीत पावसाळी अधिवेशनासंदर्भात चर्चा झाली.
समोर आलेल्या माहितीनुसार आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकील 24 पक्षांची उपस्थिती होती. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये पावसाळी अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांवर सरकारला जाब विचारायचा यावर रणनीती आखण्यात आली आहे.
पावसाळी अधिवेशनामध्ये आठ प्रमुख मुद्दे उपस्थित केले जाणार
1 पहलगाम दहशतवादी हल्ला, दहशतवादी अद्याप का पकडले गेले नाहीत?
2 ऑपरेशन सिंदूर, युद्धबंदी आणि ट्रम्प यांचा दावा – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी 24 वेळा असा दावा केला की व्यापार कराराच्या बदल्यात युद्धबंदी करण्यात आली होती, या मुद्द्यावर पंतप्रधान गप्प आहेत. पंतप्रधानांनी यावरील चर्चेदरम्यान उपस्थित राहावे आणि उत्तर द्यावे.
3. एसआयआर मतदानावर बंदी, मतदानाचा अधिकार धोक्यात आहे.
4 . परराष्ट्र धोरण: चीन, गाझा बद्दल
5. दलित, अल्पसंख्याक, महिलांवरील अत्याचार
6. सीमांकन
7. अहमदाबाद विमान अपघात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ॲापरेशन सिंदूर संदर्भात होणाऱ्या चर्चेदरम्यान सभागृहात उपस्थित रहावं यावर विरोधक आग्रही आहेत . मोदींनी ॲापरेशन सिंदूर बाबत सभागृहाला माहिती द्यावी अशी मागणी विरोधकांची आहे, या बैठकीत या मुद्द्यावर जोर देण्यात आला आहे. पहलगाम हल्ला झाला, त्यातील दहशतवादी अजूनही का पकडले गेले नाहीत, यावरून विरोधक या पावसाळी अधिवेशनामध्ये मोदी सरकारला घेरण्याच्या तायरीमध्ये आहेत.
दरम्यान इंडिया आघाडीची पुढची बैठक लवकरच होणार आहे, काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीपूर्वी इंडिया आघाडीची बैठक व्हावी, अशी इच्छा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती, त्यानंतर आज इंडिया आघाडीची बैठक पार पडली आहे.