सरकारच्या विरोधात ठाकरे गटाने थोपटले दंड, नाशिकमध्ये भाजपला ठाकरे गटाचा कशासाठी विरोध?

राज्य सरकारकडून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली जातात. मात्र, विकास कामे करत असतांना दोन स्तर यामध्ये येतात. शहरात महापालिका आणि ग्रामीण भागात जिल्हा परिषद आहे.

सरकारच्या विरोधात ठाकरे गटाने थोपटले दंड, नाशिकमध्ये भाजपला ठाकरे गटाचा कशासाठी विरोध?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 6:04 PM

नाशिक : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ठाकरे गट ( Thackeray Group ) भाजपसह एकनाथ शिंदे ( BJP ) यांच्यासह चाळीस आमदारांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. अशातच आता महापालिकेच्या हद्दीतील कामेही आता राज्याच्या सार्वजनिक विभागाकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू आहे. त्याला विरोध करण्यासाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि माजी नगरसेवकांनी दंड थोपटले आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून यावेळी निवेदन देण्यात आले असून महापालिकेच्या स्वायत्त संस्थेच्या अस्तित्वाला बोट लावण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका यावेळेला निवेदनात करण्यात आली आहे. याशिवाय शिवसेना ठाकरे गटाकडून भाजपाचे तिन्हीही आमदारांना एकूणच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न यावेळेला केल्याचे दिसून आले आहे.

राज्य सरकारकडून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली जातात. मात्र, विकास कामे करत असतांना दोन स्तर यामध्ये येतात. शहरात महापालिका आणि ग्रामीण भागात जिल्हा परिषद आहे.

परंतु यामुळे आमदार आणि स्थानिक नगरसेवक किंवा सदस्य अशी दुसरी फळी असल्याने आपापसातील संघर्ष टाळण्यासाठी आमदार राज्याकडून ही कामे करण्यास प्राध्यान्य देत आहे. विशेषतः रस्त्यांची कामे ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्याचा प्रयत्न आहे.

हे सुद्धा वाचा

याच आमदारांच्या भूमिकेवरुन महापालिकेच्या आयुक्तांसह राज्य सरकारच्या विरोधात नाशिकमधील ठाकरे गटाने आक्षेप घेत दंड थोपटले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये ठाकरे गत विरुद्ध भाजप आमदार यांच्यात नवा संघर्ष उभा राहिला आहे.

अनेकदा जिल्हा नियोजन समितिच्या माध्यमातून स्थानिक प्रतिनिधी कामे करत असतात. पण पक्षभेद किंवा सत्ता असल्यास आपापसात वाद होण्याची शक्यता असल्याने अनेकदा स्थानिक स्वराज्य संस्थेची एनओसी घेऊन कामे हस्तांतरित करण्याचा प्रकार समोर आला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कामे करण्यासाठी शहरातील तिन्हीही भाजपाच्या आमदारांचा कल असल्याने त्यांना घेरण्याचा प्रयत्न शिवसेना ठाकरे गटाकडून केला जात आहे. महापालिका क्षेत्रातील कामे हस्तांतरित करू नये यासाठी निवेदन दिले आहे.

पालिकेच्या कामाची तुलना सार्वजनिक विभागाशी केल्यास पालिकेचे काम चांगले असून सार्वजनिक विभागाच्या कामाची गुणवत्ता खराब आहे. त्यामुळे भविष्यात आणखी त्रास जाणवू शकतो असा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या पदाढीकऱ्यांकडून शिवसेना ठाकरे गटाला सुरुंग लावलेला असतांना ठाकरे गटाकडून माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांना एकत्र आणून शक्तीप्रदर्शन करण्याचा हा प्रयत्न दिसून आला आहे. ठाकरे गटाने पालिका आयुक्तांना निवेदन दिले त्यावेळी हे चित्र पाहायला मिळाले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.