IT Raid: आयकर विभागाचा छापा, बंगल्यातील फर्निचर फोडून काढल्या नोटा, 26 कोटींची रोकड अन्…
Income Tax Department raids: मागील काही महिन्यांपासून राज्यातील विविध ठिकाणी आयकर विभागाकडून छापेमारी केली जात आहे. या छापेमारीत मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी रक्कम उघड होत आहे. परंतु त्याची अधिकृत माहिती आयकर विभागाकडून दिली जात नाही.

Income Tax Department raids: नाशिक शहरातील सराफ व्यवसायिकांकडे गेल्या दोन दिवसांपासून आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या एका ज्वेलर्सच्या दुकानावर तसेच त्यांच्या निवासस्थानावर आणि इतर ठिकाणी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून 30 तासांपासून तपासणी सुरू आहे. एकाच ज्वेलर्सच्या दोन दालनांमध्ये तपासणी सुरु होती. नाशिक, नागपूर, जळगावच्या पथकातील 50 अधिकाऱ्यांची एकाच वेळी कारवाई केली. या छापेमारीत बंगल्यातील फर्निचर फोडून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोटा काढल्या.
पोलीस बंदोबस्तात छापेमारी
नाशिक शहरात सराफ व्यवसायिक आणि बांधकाम व्यवसायिकांवर गुरुवारपासून आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली. अचानक झालेल्या छापेमारीत कर बुडव्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले. मागील काही दिवसांपासून कर बुडवे व्यवसायिक हे आयकर विभागाच्या रडारवर होते. त्यानुसार आयकर विभागाचे अधिकारी खासगी वाहनातून नाशिकमध्ये दाखल झाले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी छापेमारी सुरू केली. ज्या ठिकाणी छापेमारी सुरू होती, त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.
#WATCH | The Income Tax Department launched a raid on Surana Jewellers in Nashik, in response to alleged undisclosed transactions by the proprietor. About Rs 26 crore in cash and documents of unaccounted wealth worth Rs 90 crore have been seized in raids carried out by the Income… pic.twitter.com/lnv9wAGi3N
— ANI (@ANI) May 26, 2024
90 कोटींच्या बेहिशोबी मालमत्ता
नाशिकमध्ये बड्या सराफी व्यवसायिकावर आयकर विभागाने छापेमारीची बातमी शहरात सर्वत्र पसरली. त्यानंतर त्याची चर्चा सुरु झाली. आयकर विभागाच्या छाप्यात 26 कोटींची रोकड तर 90 कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेची दस्तऐवज जप्त करण्यात आले. सलग तीस तास ही तपासणी करण्यात आली. आयकर चुकवल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली.

आयकर विभागाच्या छाप्यात मिळालेली रक्कम
मनमाडमध्ये छापेमारी
नाशिकप्रमाणे मनमाड शहरात आयकर विभागाने छापेमारी केली. मालेगावमधील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका उद्योगपतीच्या घरावर आणि कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. ज्या उद्योगपतीच्या घर आणि उद्योगावर छापा टाकला त्याचे वेगवेगळे व्यवसाय आहेत. याबाबत आयकर विभागाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली.
मागील काही महिन्यांपासून राज्यातील विविध ठिकाणी आयकर विभागाकडून छापेमारी केली जात आहे. या छापेमारीत मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी रक्कम उघड होत आहे. परंतु त्याची अधिकृत माहिती आयकर विभागाकडून दिली जात नाही. आता नाशिक शहरातील सराफा व्यावसायिकांवर पडलेल्या धाडीमुळे खळबळ उडाली आहे.
