AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यावर मोठं संकट, दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळाच, अमरावती, अकोला आणि वर्धात ऑरेंज अलर्ट..

भारतीय हवामान विभागाने नुकताच अत्यंत मोठा इशारा दिला. राज्यावर उष्णतेसह पावसाचा संकट कायम आहे. आजही सूर्य आग ओकणार आहे. भारतीय हवामान विभागाने तीन जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला. यासोबतच पावसाचाही इशारा देण्यात आला.

राज्यावर मोठं संकट, दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळाच, अमरावती, अकोला आणि वर्धात ऑरेंज अलर्ट..
Orange Alert
| Updated on: May 22, 2026 | 7:11 AM
Share

राज्यात उष्णतेची लाट कायम आहे. काल तीन जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला. उष्णतेने कहर केला. पुढील दोन दिवस राज्यातील तीन जिल्ह्यांना अतितिव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला. विदर्भतील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाला पोषक वातावरणही मिळतंय. अकोला, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात रेड अलर्टनंतर उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. पुढील दोन दिवस या तिन्ही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असणार. गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर आणि गोदिंया या जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवस उष्णतेची लाट असणार आहे. मात्र, दुसरीकडे रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. अहिल्यानगर, सांगली, ठाणे, रायगड, बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पुढील 3 दिवस ढगाळ वातावरण असेल. हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

राज्यात दुहेरी वातावरण बघायला मिळत आहे. कुठे पाऊस तर कुठे उष्णतेचा कहर. त्यामध्येच आजही भारतीय हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा मोठा इशारा देण्यात आला. नागरिकांनी शक्यतो दुपारी अतिमहत्वाच्या कामाशिवाय 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळावे. गोंदिया जिल्ह्यात 44 ते 45 अंशावर तापमान आले असून वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताच्या घटना पुढे येत आहेत.

भंडारा जिल्ह्यात 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, यंदाच्या उन्हाळ्यातील हा सर्वाधिक उष्ण दिवस ठरल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. प्रखर उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक लस्सी, लिंबू सरबत व अन्य शीतपेयांच्या दुकानांकडे मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.

अकोला जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून नागरिक अक्षरशः होरपळून निघत आहेत. दरम्यान, पुढील तीन ते पाच दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमानाचा पारा सतत चढत असल्याने अकोला जिल्ह्यासाठी रेड अलर्ट होता. उन्हाचा वाढता तडाखा लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ