AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यात थेट रेड अलर्ट, 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळाच, प्रशासनाने..

भारतीय हवामान विभागाने नुकताच मोठा इशारा दिला. आज उष्णतेचा कहर बघायला मिळेल. तब्बल तीन जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने उष्णतेचा रेड अलर्ट जारी केला. यासोबत काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला.

अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यात थेट रेड अलर्ट, 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळाच, प्रशासनाने..
Red alert in Amravati Wardha and Akola
| Updated on: May 21, 2026 | 7:24 AM
Share

राज्यात उष्णतेचा कहर बघायला मिळतोय. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा अलर्ट जारी केला. थेट उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. अमरावती, वर्धा आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. नागरिकांनी दुपारी 12 ते 4 यादरम्यान घराबाहेर पडणे टाळावे. काल राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद अमरावती येथे झाली. अमरावतीमध्ये 46.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. आज नागपूर, यवतमाळ, आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. जवळपास जिल्ह्यांमध्ये 45 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमानाची नोंद झाली. त्यामध्येच आज रेड अलर्ट जारी करण्यात आला. महाबळेश्वर येथे नीचांकी तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वर येथे नीचांकी 18.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

मराठवाडा आणि विदर्भात सूर्य आग ओकत आहे. वर्धा जिल्ह्यात उष्णतेचा कहर बघायला मिळतोय. वर्ध्याचे तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यंदाच्या मोसमातील तापमानाचा नवा उच्चांक बघायला मिळतोय. यंदा देशातील उष्ण शहरांपैकी वर्धा शहर ठरत आहे. मागील सलग दोन दिवस 46.5 अंश सेल्सिअस तापमान नोंद झाल्यानंतर पुन्हा तापमानात वाढ झाली.

मागील काही दिवसांपासून तापमान सातत्याने वाढ होत आहे.  तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये काळजी घेणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून अलर्टही जारी करण्यात आला. देऊळगावराजा शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. तब्बल 20 दिवसांनंतरही अपुरा आणि अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने हजारो महिला-पुरुषांनी थेट नगरपालिकेवर धडक देत जोरदार आंदोलन छेडले. उष्णता वाढत असल्याने पाण्याची पातळी घसरत आहे.

भंडारा, जळगाव, गोदिंया, वाशिम, परभणी, गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही आज उष्णता वाढण्याची शक्यता आहे. आज काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा रेड अलर्ट दिल्याने प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्णघाताच्या रूग्णांमध्ये सातत्याने मोठी वाढ होताना दिसत आहे. उष्णघातापासून दूर राहण्याकरिता नक्की काय काळजी घ्यावी, याबाबत प्रशासनाने सूचना जारी केल्या आहेत. जास्तीत जास्त पाणी उष्णघातापासून दूर राहण्याकरिता प्यावे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ