AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar-Eknath Shinde : शरद पवार विधानभवनात थेट एकनाथ शिंदेंनाच का भेटले? या सरप्राइज भेटीचा अर्थ समजून घ्या

Sharad Pawar-Eknath Shinde : शरद पवार काल विधान भवनात गेले होते. त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शरद पवार थेट एकनाथ शिंदे यांना जाऊन का भेटले, त्या भेटीमागचा अर्थ समजून घ्या.

Sharad Pawar-Eknath Shinde : शरद पवार विधानभवनात थेट एकनाथ शिंदेंनाच का भेटले? या सरप्राइज भेटीचा अर्थ समजून घ्या
Sharad Pawar-Eknath shinde Image Credit source: PTI
| Updated on: Jul 09, 2026 | 10:36 AM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात काल एक घटना घडली. दोन बड्या नेत्यांची भेट झाली. त्यावरुन राजकीय वर्तुळात विविध चर्चा, तर्क-वितर्क सुरु झाले आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी विधान भवनात भेट झाली. वरवर ही भेट एका शिष्टाचारासारखी वाटत असली तरी त्याचा टायमिंग आणि पद्धत पाहिल्यानंतर राजकारणात त्याचे वेगवेगळे अर्थ निघणं स्वाभाविक आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीसाठी शरद पवार विधान भवनात आले होते. तिथून ते थेट एकनाथ शिंदे यांच्या केबिनच्या दिशेने गेले. पवारांसोबत पक्षाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे होते.

शरद पवार आले, त्यावेळी एकनाथ शिंदे कॅबिनेट बैठकीमध्ये व्यस्त होते. शरद पवार आल्याच समजताच एकनाथ शिंदे यांनी बैठक थांबवून शरद पवार यांचं स्वागत केलं. शिंदे आणि पवारांमध्ये जवळपास 15 मिनिटं चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांचा राजकीय सन्मान ठेवला. त्याकडे मोठे संकेत म्हणून पाहिलं जात आहे. एकनाथ शिंदे पुन्हा बैठकीसाठी निघून गेल्यानंतर शरद पवार काहीवेळ केबिनमध्येच थांबले होते. आपल्या आमदारांसोबत बोलत होते.

शरद पवार एकनाथ शिंदेनाच का भेटले असतील?

अलीकडेच उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता शिंदे यांची नजर पवार गटाच्या खासदारांकडे लागल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अशावेळी शरद पवारांनी थेट एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात जाऊन आपल्या अंदाजात संदेश दिला. त्याशिवाय ही भेट सत्तारुढ महायुतीचे मुख्य रणनितीकार सीएम देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्ष संदेश असल्याच मानलं जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याऐवजी थेट उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेऊन पवारांनी हे दाखवून दिलं की, कुठल्याही सत्ता केंद्राशी थेट संवाद साधण्याची त्यांची क्षमता आहे. राजकीय मतभेद असले तरी पवार मनभेद ठेवत नाहीत. सर्वपक्षीयांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. चर्चेचे दरवाजे ते कधी बंद करत नाहीत.

विचारपूर्वक चाल

आतापर्यंत पवार आणि शिंदे दोघांनी 15 मिनिटात नेमकी काय चर्चा झाली, त्यावर सार्वजनिक भाष्य केलेलं नाही. पण राजकीय विश्लेषक याकडे पवारांची विचारपूर्वक चाल म्हणून पाहत आहेत. या सगळ्या घटनाक्रमाचा नेमका अर्थ पुढच्या काही दिवसात राजकीय समीकरणांमधून स्पष्ट होईल.

Follow Us
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार?
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार? शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचा नेमका अर्थ काय?
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, चक्क…
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम...
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... राष्ट्रवादीत काय घडतंय?
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... अचानक दिलेल्या आदेशांमुळे राष्ट्रवादीत खळबळ
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! भाविकाकडुन कोट्यवधींच दान
Pandharpur | विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! अज्ञात भाविकाकडुन कोट्यवधींचं दान
काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात...
Baramati | काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात दुमदुमली बारामती, भक्तिमय क्षण कॅमेऱ्यात कैद
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने संपवलं जीवन
इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात दुचाकीची अंत्ययात्रा
Kolhapur App Protest | इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात थेट दुचाकीची अंत्ययात्रा; सरकारविरोधात जोरदार आंदोलन
यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये रक्तरंजीत राडा!
Mumbai Local | यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजीत राडा! काय घडलं?
सिया-चेतनचा हादरवून टाकणारा कांड, जपानी व्हिडीओ पाहून केतनला…  चकवा देण्यासाठी असा होता प्लॅन!.

सिया-चेतनचा हादरवून टाकणारा कांड, जपानी व्हिडीओ पाहून केतनला… चकवा देण्यासाठी असा होता प्लॅन!

शीर नव्हते, हातही नव्हते, कुजलेल्या अवस्थेत धड सापडले, पोलिसांनी असा सोडवला गुंता….

शीर नव्हते, हातही नव्हते, कुजलेल्या अवस्थेत धड सापडले, पोलिसांनी असा सोडवला गुंता…

कार्डिफमध्ये रोहित शर्माचा षटकारांचा विक्रम, वनडेत धावांच्या शर्यतीत या दिग्गजाला टाकलं मागे.

कार्डिफमध्ये रोहित शर्माचा षटकारांचा विक्रम, वनडेत धावांच्या शर्यतीत या दिग्गजाला टाकलं मागे

सुनेत्रा पवारांनी राज्याचं नेतृत्त्व करावं, मुख्यमंत्री म्हणून…बड्या मंत्र्याचं थेट विधान; महायुतीत नेमकं काय घडतंय?.

सुनेत्रा पवारांनी राज्याचं नेतृत्त्व करावं, मुख्यमंत्री म्हणून…बड्या मंत्र्याचं थेट विधान; महायुतीत नेमकं काय घडतंय?

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीची वसुली, अर्धशतक ठोकत दिलं उत्तर.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीची वसुली, अर्धशतक ठोकत दिलं उत्तर

GK : भारतातील एकमेव राज्य, जेथे इन्कम टॅक्सची झंझटच नाही, बिनधास्त संपत्ती कमवा...

GK : भारतातील एकमेव राज्य, जेथे इन्कम टॅक्सची झंझटच नाही, बिनधास्त संपत्ती कमवा..